गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाने ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य भारत गाठेल

- केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली – जग भारताकडे विश्वासाने पाहत असून जागतिक पुरवठा साखळीतील विश्वासू भागीदार म्हणून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे. भारतातील आत्मनिर्भर बनण्याची क्षमता चांगले उत्पादन आणि गुणवत्ता या सर्वांनाच जगात मान्यता दिली जात आहे, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. तसेच भारत तंत्रज्ञान गुणवत्ता या आधारावर एक लाख कोटी डॉलर्सचे निर्यातीचे लक्ष भारत गाठू शकेल. मात्र सरकारकडून केवळ सबसिडी घेऊन लक्ष साधता येणार नाही, तर निर्यातदार आणि उद्योगांनी मिळून काम करावे लागेल, याकडे गोयल यांनी अधोरेखित केले.

गुणवत्ता

भारताने कोरोनाच्या संकटाकडे संधी म्हणून पाहिले आहे. यामुळेच या काळात विविध क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सुधारणा भारताला बळकट करतील आणि मजबुतीने जगाशी तोडण्यास तयार करतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. ‘भारताने एक ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष ठेवले आहे. हे लक्ष्य गाठता येणार नाही असा विचार करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही, असे गोयल म्हणाले.

मात्र केवळ सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीने हे लक्ष्य नक्कीच गाठता येणार नाही. निर्यातीला बळ देण्यासाठी सबसिडी एकमात्र उपाय नाही. तर निर्यात वाढू शकणाऱ्या क्षेत्रांची ओळख पटवावी लागेल. गुणवत्ता उत्पादन श्रेणी तंत्रज्ञान यावर भर द्यावा लागेल . काही वेळा छोट्या काळासाठी प्रोत्साहन देऊन निर्यात वाढीसाठी बळ देता येऊ शकेल’, असे गोयल म्हणाले.

गुणवत्ता तंत्रज्ञानात सुधारण्यासाठी सध्याच्या घडीला मदतीची आवश्यकता भासू शकते. मात्र यादृष्टीने काम केल्यास निर्यात वाढवणे शक्य होईल. जर भारतात बनणारी उत्पादन चांगल्या दर्जाची, गुणवत्तेची आणि स्पर्धात्मक किंमतींची असतील तर नक्कीच निर्यातीत वाढ होईल. मात्र निर्यात आणि स्थानिक क्षेत्रासाठी उत्पादनांना वेगळे करून पाहू नका, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

भारत चांगल्या बाजारपेठ असलेल्या विकसित देशांबरोबर काही महत्त्वाचे करा करत आहे. यामुळे भारत जागतिक पुरवठा साखळीचा विश्वासहार्य भागीदार देश बनेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply