लष्कराला लवकरच 40 हजार ‘मल्टीमोड हॅण्ड ग्रेनेड’ मिळणार

‘मल्टीमोड हॅण्ड ग्रेनेड’नवी दिल्ली – भारतीय लष्कराला स्वदेशी बनावटीचे ‘मल्टीमोड हॅण्ड ग्रेनेड’ लवकरच मिळणार आहेत. भारतीय लष्करात ब्रिटीशकालीन बनावटीचे हॅण्ड ग्रेनेड अजूही वापरले जात असून त्यांची जागा आता हे ‘मल्टीमोड हॅण्ड ग्रेनेड’ (एमएमएचजी) घेतील. नागपूरच्या ‘इकोनॉमिक एक्स्पोलोझिव्हस लिमिटेड’ या खाजगी कंपनीने उच्च दर्जाचे हँड ग्रेनेड्स विकसित केले आहेत. त्यांना दहा लाख हॅण्ड ग्रेनेड पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यातील 40 हजार हॅण्ड ग्रेनेड पुरविण्यासाठी ही कंपनी सज्ज झाली आहे. लवकरच हे हॅण्ड ग्रेनेड लष्कराकडे सुपूर्द करण्यात येतील, असे कंपनीने म्हटले आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एक खाजगी कंपनी लष्कराला हॅण्ड ग्रेनेड पुरविणार आहे.

‘इकोनॉमिक एक्स्पोलोझिव्हस लिमिटेड’ या ‘सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड’ च्या या संलग्न कंपनीला 10 लाख ग्रेनेड्ससाठी 400 कोटी रुपयांचे कंत्राट काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. यानुसार या कंपन्या लष्कराला 40 हजार ‘मल्टी-मोड हॅण्ड ग्रेनेड्स’चा (एमएमएचजी) पुरवठा करणार आहे. आतापर्यंत वापरात असलेल्या ब्रिटिश ग्रेनेड्सच्या बदल्यात हे आधुनिक ग्रेनेड्स लष्कराला मिळणार आहेत. 1915 सालापासून भारत ब्रिटिशकालीन पद्धतीचेच विंटेज हँड ग्रेनेड्स वापरत आहेत. आता त्याला स्वदेशी तंत्रज्ञानाचा पर्याय मिळला आहे.

‘मल्टीमोड हॅण्ड ग्रेनेड’नवे ‘एमएमएचजी’ ‘’इकोनॉमिक एक्स्पोलोझिव्हस लिमिटेड’ आणि ‘संरक्षण संशोधन विकास संस्था’(डीआरडीओ) व ‘टर्मिनल बॅलेस्टिक्स रिसर्च लॅब्रोरेटरी’ने (टीबीआरएल) संयुक्तरीत्या विकसित केले आहेत. डीआरडीओचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर यंत्रणा या ‘एमएमएचजी’चे निरीक्षण करतील. त्यानंतर पुढच्या आठ ते दहा दिवसात याचा पुरवठा होईल, असे ‘इकोनॉमिक एक्स्पोलोझिव्हस लिमिटेड’ कंपनीचे उपमहासचिव अनमोल राठी म्हणाले.

विंटेज हँन्ड ग्रेनेडच्या तुलनेत हे ग्रेनेड्स सुरक्षित आहेत. तसेच हे नवीन ग्रेनेड्स बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येऊ शकतात. जवान शेल्टरमध्ये आणि शत्रू मैदानात असताना देखील ते उपयुक्त ठरतील. हलक्या वजनाचे हे ग्रेनेड्स जवानांनी दागल्यानंतर पाच मीटर परिसरापर्यंत त्याची तीव्रता जाणवेल. या स्वदेशी बनावटीच्या ग्रेनेड्समुळे भारतीय लष्कराची क्षमता अधिकच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

leave a reply