स्वदेशी बनावटीच्या ‘विग्रह’चा तटरक्षक दलामध्ये समावेश

चेन्नई – शनिवारी चेन्नई येथे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय तटरक्षकदलात स्वदेशी बनावटीच्या ‘विग्रह’ जहाजाचे राष्ट्रार्पण केले. 2015 साली भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात प्रथमच खाजगी क्षेत्रातील कंपनीबरोबर सात जहाजांच्या उभारणीचा करार करण्यात झाला होता. तटरक्षकदलांसाठी ही जहाजे खरेदी करण्यात आली आहेत. केवळ सात वर्षात ही सात जहाजे बांधून पुर्ण झाली आणि ‘विग्रह’च्या तटरक्षकदलातील समावेशाबरोबर या सर्व जहाजांची देशाच्या सेवेत दाखल होण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाल्याचे यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आधोरेखित केले.

98 मीटर लांबीच्या या जहाजाची रचना आणि उभारणी लार्सन अँड टुब्रोने केली आहे. यावर अत्याधुनिक रडार, दिशादर्शन आणि संपर्क साधने तसेच उष्णकटिबंधातील समुद्राच्या वातावरणात कार्य करण्याची क्षमता असणारी यंत्रे बसविण्यात आली आहेत. तसेच हे जहाज 40/60 बोफोर्स तोफा आणि 12.7 एमएम लांब पल्ल्यांची बंदूक आणि आग नियंत्रण प्रणालीनेही सज्ज आहे. बोर्डिंग ऑपरेशन, शोध आणि मदत, कायद्याची अंमलबजावणी तसेच सागरी गस्त या कार्यांसाठी आवश्‍यक दुहेरी इंजिन हेलिकॉप्टर आणि चार अतिवेगवान छोट्या बोटींची या जहाजावर तैनाती आहेत. या जहाजाचे वजन 2200 टन असून त्यावर बसविलेल्या 9100 किलो वॅटची डिझेल इंजिनांच्या सहाय्याने हे जहाज 5000 26 नॉट्स प्रती मैल वेगाने प्रवास करू शकते.

भारत जहाज बांधणी क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल. ‘विग्रह’सह इतर सात जहाजांची उभारणी या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर बनत असल्याचे दाखविते, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘विग्रह’च्या समावेशाबरोबर भारतीत तटरक्षकदलाच्या ताफ्यातील जहाजांची संख्या 157 वर पोहोचली आहे

leave a reply