इराणच्या नौदलाचा कॅस्पियन समुद्रात युद्धसराव

तेहरान – इराणच्या नौदलाने कस्पियन समुद्रात मोठा युद्धसराव सुरू केला आहे. इराणच्या उत्तरेकडील सागरी सीमा त्याचबरोबर सागरी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी हा युद्धसराव आयोजित केल्याचे इराणने जाहीर केले. गेल्या आठवड्यात इराणचा शेजारी अझरबैजानने या सागरी क्षेत्रात युद्धसरावाचे आयोजन केले होते. त्यानंतर इराणने देखील सरावाचे आयोजन केल्याचे दिसत आहे. इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘सस्टेनेबल सिक्युरिटी 1400’ हा सराव सुरू झाला. कॅस्पियन समुद्रातील इराणच्या 77 हजार किलोमीटर क्षेत्रात हा स्राव सुरू आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या सरावात इराणी नौदलाच्या विनाशिका, विमाने, हेलिकॉप्टर्स, ड्रोन्सनी सहभाग घेतला आहे. या सरावामध्ये इराणच्या नौदलाचे मरिन्स व कमांडो वेगवेगळ्या कवायती करणार असल्याचे इराणी माध्यमांनी स्पष्ट केले.

इराणच्या नौदलाचा कॅस्पियन समुद्रात युद्धसरावया सरावात इराणी नौदलाबरोबर हवाईदल तसेच हवाई सुरक्षा यंत्रणा देखील सहभागी झाल्या आहेत. इराणच्या उत्तरेकडील कॅस्पियन समुद्रातील सागरी वाहतूक तसेच हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी हा सराव सुरू असल्याचे इराणी माध्यमांनी सांगितले. गेल्या काही वर्षांमध्ये इराणने उत्तरेकडील कॅस्पियन तसेच दक्षिणेकडील पर्शियन आखातात वेगवेगळे युद्धसराव आयोजित केले होते. हा सराव देखील याचाच एक भाग असल्याचे इराणी माध्यमे सांगत आहेत.

पण अझरबैजानने केलेल्या युद्धसरावानंतर इराणच्या नौदलाने हा सराव आयोजित केल्याचे लक्षात आणून दिले. गेल्या आठवड्यात अझरबैजानने कॅस्पियन समुद्रात असाच सराव आयोजित केला होता. इराण आणि अझरबैजान शेजारी देश असले तरी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. आर्मेनियाबरोबरच्या संघर्षात पाकिस्तान अझरबैजानची बाजू घेत असताना, इराणने मात्र भूमिका घेण्याचे टाळले होते. यामुळे अझरबैजान इराणवर नाराज झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

leave a reply