इराकमधील प्रवासी व लष्करी हवाईतळांवरील हल्ले वाढले

बगदाद – इराकची राजधानी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी ड्रोन्सचे तीन हल्ले झाले. याच्या काही तास आधी इराकच्या बलाड शहरातील अमेरिकेच्या लष्करी तळावर पाच रॉकेटचा मारा झाला होता. 24 तासात झालेल्या या दोन हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण इराणसंलग्न दहशतवादी संघटना यामागे असावी, अशी दाट शक्यता समोर येत आहे. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधिमी अमेरिकाधार्जिणे असल्याचा आरोप करून इराकमधील या इराणसमर्थक दहशतवादी संघटना घातपात घडवित असल्याचे याआधी उघड झाले होते.

Advertisement

इराकमधील प्रवासी व लष्करी हवाईतळांवरील हल्ले वाढलेबगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्हिक्टरी मिलिटरी बेसवर ड्रोन्सचे हल्ले झाले. या हल्ल्यातील हानीचे तपशील उघड होऊ शकलेले नाही. तसेच हे ड्रोन्स कुठल्या बनावटीचे होते, याचा तपास सुरू आहे. या ड्रोन हल्ल्यांमुळे बगदाद विमानतळाच्या भागात तणाव निर्माण झाला होता. याआधी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले झाले होते. पण विमानतळातील महत्त्वाच्या धावपट्टीजवळ ड्रोन धडकल्याने चिंता व्यक्त केली जाते.

या ड्रोन हल्ल्यांच्या साधारण दीड तास आधी राजधानी बगदादच्या उत्तरेकडे असलेल्या बलाड लष्करी तळावर पाच क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यातील दोन रॉकेट अमेरिकेचे लष्करी कंत्राटदार वापरत असलेल्या ठिकाणी कोसळले. बलाडवरील रॉकेट हल्ल्यांमध्ये एकूण चार जण जखमी झाले?असून यामध्ये तीन परदेशी तर एका स्थानिक कंत्राटदाराचा समावेश आहे.इराकमधील प्रवासी व लष्करी हवाईतळांवरील हल्ले वाढले

याआधी रविवारी ‘अईन अल-असाद’ हवाईतळावर ड्रोन्सचे दोन हल्ले झाले होते. गेल्या पाच दिवसांमध्ये झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस-पीएमएफ’ ही इराणसंलग्न दहशतवादी संघटना यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो. गेल्या महिन्यात, 27 मे रोजी, पीएमएफचा नेता ‘मुस्लेह’ याला इराकच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते.

इराकमधील प्रवासी व लष्करी हवाईतळांवरील हल्ले वाढलेअमेरिकेच्या हवाईतळावरील हल्ल्यासाठी इराकच्या सुरक्षा यंत्रणांनी मुस्लेह याच्यावर ही कारवाई केली होती. यानंतर पीएमएफच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी थेट ग्रीनझोनमध्ये घुसून पंतप्रधान कधिमी यांच्या कार्यालयाला घेरले होते. राजधानी बगदादच्या ग्रीनझोन भागात इराक सरकारची कार्यालये तसेच परदेशी दूतावास आहेत. अशा परिस्थितीत, इराणसंलग्न दहशतवादी या भागात घुसल्यामुळे ग्रीन झोनमधील तणाव वाढला होता. पीएमएफच्या आक्रमकतेमुळे इराकच्या जनतेमधील या संघटनेची प्रतिमा डागळल्याची टीका स्थानिक धार्मिक नेत्यांनी केली होती.

दोन दिवसांपूर्वी इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल इस्माईल घनी यांनी इराकचा आकस्मिक दौरा केला व त्यांनी इराकच्या लष्कराच्या कैदेतील पीएमएफचा नेता मुस्लेह याची सुटका करून घेतली. मुस्लेहच्या सुटकेनंतर इराकच्या हवाईतळांवरील हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानप्रमाणे अमेरिकेने इराकमधूनही पूर्ण सैन्यमाघार घ्यावी, अशी मागणी पीएमएफ तसेच इराकमधील इराणसंलग्न नेते व गट करीत आहेत. मात्र अमेरिकेने इराकमधून माघार घेतली तर आपला देश पूर्णपणे इराणच्या प्रभावाखाली जाईल, अशी चिंता इथली जनता व्यक्त करीत आहे.

leave a reply