चीनच्या धमकीनंतरही जपानचा तैवानला कोरोनाप्रतिबंधक लसीचा पुरवठा

तैपेई – कोरोनाच्या साथीचा फायदा घेऊन कुठल्याही देशाने चीनच्या अंतर्गत मुद्यांमध्ये हस्तक्षेप करू नये, तैवानला स्वतंत्ररित्या कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय सहाय्य पुरवू नये, अशी धमकी चीनने दिली होती. पण चीनच्या या धमकीला काडीचीही किंमत न देता, जपानने तैवानसाठी 12 लाखांहून अधिक कोरोनाप्रतिबंधक लसी पुरविल्या आहेत. तसेच हे सहाय्य जपानचे तैवानसोबत असलेल्या सहकार्याचे महत्त्व आणि मैत्री अधोरेखित करीत असल्याची घोषणा जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी केली.

Advertisement

चीनच्या धमकीनंतरही जपानचा तैवानला कोरोनाप्रतिबंधक लसीचा पुरवठागेल्या महिन्यात जगभरात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना, तैवानमध्येही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत चालली होती. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तैवानने आपल्या जनतेच्या लसीकरणाला महत्व दिले. तसेच सहकारी व मित्रदेशांनी आपल्याला कोरोनाप्रतिबंधक लसींसाठी पुरवठा करावा, असे आवाहन केले होते. तैवानच्या या आवाहनाला जपानने प्रतिसाद दिल्यानंतर, संतापलेल्या चीनने जपानला धमकावले होते.

चीनच्या धमकीनंतरही जपानचा तैवानला कोरोनाप्रतिबंधक लसीचा पुरवठाआंतरराष्ट्रीय रोगप्रतिबंधक मोहिमेत चीनने नेहमी मोठे योगदान दिले आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील सध्याच्या या साथीचा राजकीय लाभ घेण्याचे किंवा चीनच्या अंतर्गत मुद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचे टाळावे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी बजावले होते. तर आपल्याच जनतेला कोरोनाप्रतिबंधक लस पुरविण्यात अपयशी ठरणार्‍या जपानने तैवानच्या मदतीसाठी धाव घेऊ नये, असा इशारा वेंबिन यांनी दिला होता.

चीनच्या धमकीनंतरही जपानचा तैवानला कोरोनाप्रतिबंधक लसीचा पुरवठातैवानच्या जनतेला कोरोनाप्रतिबंधक लस मिळू नये, यासाठी चीन अडवणूक करीत असल्याचा आरोप तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी केला होता. जपानप्रमाणे जर्मनीबरोबरचे सहकार्य मोडून काढण्यासाठी चीन हस्तक्षेप करीत असल्याची जळजळीत टीका राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी केली होती. तर जपानने देखील चीनच्या धमकीला अजिबात महत्व न देता, तैवानसाठी कोरोनाप्रतिबंधक लसींचा साठा रवाना केला.

शुक्रवारी 12 लाख 40 हजार कोरोनाप्रतिबंधक लसी तैवानच्या तौयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्या. गेल्या महिन्यात तैवानकडे जेमतेम सात लाख डोस होते. आपल्या सर्व जनतेचे लसीकरण करण्यासाठी तैवानने अ‍ॅस्ट्राझेंका, मॉर्डना आणि कोवॅक्सबरोबर करार केले आहेत. पण चीन आपला प्रभाव वापरून तैवानला लस मिळू नये, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.

leave a reply