सलग सात दिवस भडकलेल्या वणव्यात ग्रीसमधील दीड लाख एकरांहून अधिक क्षेत्र जळून खाक

अथेन्स – ग्रीसमध्ये रेकॉर्डब्रेक ‘हिटवेव्ह’मुळे भडकलेल्या वणव्यांमध्ये तब्बल १ लाख ६० हजार एकरांहून अधिक क्षेत्र जळून खाक झाले आहे. यातील ६० टक्क्यांहून अधिक भाग जंगल व शेतीचा असल्याचे समोर आले आहे. ग्रीसची राजधानी अथेन्सपासून जवळ असणार्‍या एव्हिआ बेटासह ऍटिका व लॅकोनियामध्ये वणवे भडकले असून, सात दिवसांनंतरही त्यावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. ग्रीसव्यतिरिक्त इटली, स्पेन व ग्रीसला जोडून असलेल्या तुर्कीमध्येही वणवे भडकल्याचे समोर आले होते.

सलग सात दिवस भडकलेल्या वणव्यात ग्रीसमधील दीड लाख एकरांहून अधिक क्षेत्र जळून खाकगेल्या महिन्यात ग्रीसमध्ये तीन दशकांमधील विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. देशाच्या अनेक भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. उष्णतेच्या या लाटेमुळे ग्रीसमधील जंगलांमध्ये वेगाने वणवे भडकण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात २४ तासांच्या अवधीत जवळपास ५० वणवे भडकल्याचे ग्रीक पंतप्रधान किरिआकोस मित्सोताकिस यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले होते.

सलग सात दिवस भडकलेल्या वणव्यात ग्रीसमधील दीड लाख एकरांहून अधिक क्षेत्र जळून खाकएव्हिआ बेटावरील वणवा ३ ऑगस्टपासून भडकण्यास सुरुवात झाली. हे बेट ग्रीसमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बेट असून राजधानी अथेन्सच्या उत्तरेस आहे. एव्हिआच्या उत्तरेकडील जवळपास ५० टक्के भाग वणव्यात पूर्णपणे जळून खाक झाला आहे. एव्हिआतील वीज खंडित झाली असून दोन हजारांहून अधिक नागरिक व पर्यटकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या बेटावरील जवळपास एक लाख एकरांहून अधिक क्षेत्र जळाल्याची माहिती ग्रीक यंत्रणांनी दिली.

सलग सात दिवस भडकलेल्या वणव्यात ग्रीसमधील दीड लाख एकरांहून अधिक क्षेत्र जळून खाकऍटिका व लॅकोनियामध्येही वणवे भडकले असून, लॅकोनियामधील २७ हजार एकर तर ऍटिकामधील २० हजार एकर क्षेत्र वणव्यात जळून खाक झाले आहे. ग्रीसमधील आग नियंत्रणात आणण्यासाठी ३०हून अधिक विमाने व हेलिकॉप्टर्स शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने आपली विमाने व स्वयंसेवक ग्रीससाठी रवाना केले आहेत. युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांनी नऊ विमानांसह एक हजारांहून अधिक स्वयंसेवक ग्रीसमध्ये तैनात केल्याची माहिती महासंघाने दिली आहे.

दरम्यान, ग्रीसममधील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी ग्रीसमधील वणव्यांमागे घातपाताचा प्रयत्न आहे का याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

leave a reply