रशियाला अणुयुद्धात पराभूत करण्यासाठी नाटोचा मास्टर प्लॅन

- नाटोला संबंध सुधारायचे नसल्याची रशियाची टीका

ब्रुसेल्स/मॉस्को – रशियाबरोबरचे संबंध शीतयुद्धकाळानंतर सर्वात खालच्या पातळीवर गेल्याचा दावा नाटो करीत आहे. त्यामुळे येत्या काळात रशियाविरोधात युद्ध पेटलेच तर त्यामध्ये रशियाला कसे पराभूत करायचे, याचा मास्टर प्लॅन नाटोने आखला आहे. रशियाशी अणुयुद्ध छेडण्याची तयारीही नाटोने केल्याची माहिती ब्रुसेल्स येथील बैठकीनंतर समोर येत आहे. नाटोच्या या घोषणेवर रशियाने तीव्र संताप व्यक्त केला. अमेरिका पुरस्कृत नाटोला रशियाबरोबर संबंध सुधारायचेच नसल्याचे यातून उघड झालेले आहे, अशी घणाघाती टीका रशियाने केली.

रशियाला अणुयुद्धात पराभूत करण्यासाठी नाटोचा मास्टर प्लॅन - नाटोला संबंध सुधारायचे नसल्याची रशियाची टीकाब्रुसेल्स येथील नाटोच्या मुख्यालयात सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक पार पडली. ‘कन्सेप्ट ऑफ डिटरन्स अँड डिफेन्स इन द युरो-अटलांटिक एरिया’ यावर आधारीत सदर बैठकीत रशियाविरोधात नाटो सदस्य देशांचे एकमत झाल्याचा दावा केला जातो. नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी रशियाबरोबरचे संबंध अतिशय खालच्या पातळीवर गेल्याचे सांगितले. रशियाने नाटोतील आपले कार्यालय बंद केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे स्टोल्टनबर्ग म्हणाले.

यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन व नाटोच्या अन्यसदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत रशियाविरोधी युद्धाच्या योजनेवर एकमत झाले. नजिकच्या काळात रशियाकडून हल्ल्याचा धोका नसल्याचे नाटोच्या अधिकार्‍यांनी मान्य केले. रशियाला अणुयुद्धात पराभूत करण्यासाठी नाटोचा मास्टर प्लॅन - नाटोला संबंध सुधारायचे नसल्याची रशियाची टीकापण तशीच परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी तयारी ठेवण्याचे या बैठकीत संमत करण्यात आले. बाल्टिक क्षेत्र तसेच ब्लॅक सीच्या क्षेत्रातील देशांना रशियाकडून धोका असल्याचे सांगून नाटोने लष्करी संघर्षाची तयारी ठेवावी, अशी सूचना या बैठकीत देण्यात आली.

त्याचबरोबर रशियाविरोधात अणुयुद्ध, सायबर हल्ले तसेच अंतराळ युद्ध अशा अपारंपरिक युद्धाच्या योजनेवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी नाटोच्या या बैठकीवर सडकून टीका केली. नाटोची अशीच मनोवृत्ती असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याला काहीच अर्थ नसल्याचे या बैठकीमुळे स्पष्ट झाल्याचे ताशेरे पेस्कोव्ह यांनी ओढले.

leave a reply