भारतात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम एका दिवसात दोन कोटीहून अधिक जणांचे लसीकरण

नवी दिल्ली – भारताने १३ सप्टेंबर रोजी कोरोना लसींचे ७५ कोटी डोस देण्याचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर आवघ्या चार दिवसातच भारतात नागरीकांना देण्यात आलेल्या लसीच्या मात्रेची संख्या ८० कोटींजवळ पोहोचली आहे. याचे कारण शुक्रवारी देशभरात विक्रमी लसीकरण झाले. एका दिवसात सुमारे सव्वा दोन कोटी जणांना लसीचे डोस देण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा हा जागतिक विक्रम आहे. तर महिनाभराहून कमी कलावाधीत चार वेळा एक दिवसात एक कोटीहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. भारत या वर्षाच्या अखेरीपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्यास सक्षम असल्याचे कोरोनावरील केंद्रीय वर्कींग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन.के. आरोरा यांनी म्हटले आहे.

भारतात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम एका दिवसात दोन कोटीहून अधिक जणांचे लसीकरणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात लसीकरणाचा या कार्यक्रमाला अधिकच वेग देण्यात आला. शुक्रवारी देशभरात एक लाखाहून अधिक लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. एका दिवसात २.५ कोटी लस देण्याचे लक्ष्य आरोग्यमंत्रालयाने ठेवले होते. मात्र सायंकाळी ७.४० पर्यंत २ कोटी २२ लाख ३१ हजारहून अधिक जणांना लस मिळाल्याचे कोविन ऍपद्वारे मिळालेल्या डाटानुसार स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारासच एका दिवसात कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा टप्पा पार झाला. त्यानंतर दीड तासात हीच संख्या दीड कोटीच्या पुढे गेली. तर सायंकाळ पाच वाजर्यंत दिवसात दोन कोटी डोस देण्याचा टप्पाही ओलांडला गेला. २७ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा देशात एका दिवसात एक कोटीहून अधिक जणांचे लसीकरण झाले होते. तर ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा एका दिवसात एक कोटीहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर ६ सप्टेंबरला हा टप्पा पुन्हा एकदा पार झाला. तर शुक्रवारी १७ सप्टेंबरला नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. शुक्रवारच्या लसीकरण प्रचंड वेगाने झाले, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी अधोरेखित केले.

याआधी गुरुवारी सुमारे ६४ लाख जणांना एका दिवसात लस देण्यात आली होती. यामुळे शुक्रवारच्या सकाळपर्यंत आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींचे सख्या ७७.२४ कोटींवर गेली होती. तेच शुक्रवारी सायंकाळ पर्यंत झालेले लसीकरण पाहता आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लसींच्या डोसची संख्या ७९.५ कोटींच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, केंद्र सरकार लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत राज्यांना लसी पुरवित असून सध्या राज्यांकडे ६ कोटीहून अधिक लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा केंद्र सरकारकडून होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारने ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत १०० कोटी लसींचे डोस देण्याचे लक्ष ठेवले होते. मात्र सध्याचा लसीकरणाचा वेग पाहता हे लक्ष याआधीच गाठले जाण्याची शक्यता आहे. देशात जानेवारीत कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यावर पहिल्या १० कोटी जणांना लस देण्यासाठी ८५ दिवसांचा कालावधी लागला होता.

leave a reply