‘को-विन’ इतर देशांसाठी खुले

नवी दिल्ली – भारत ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या प्राचीन संस्कृती व तत्त्वांवर विश्‍वास ठेवत असून ‘को-विन’सारखे व्यासपिठ इतर देशांसाठी खुले करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. जागतिक ‘को-विन’ कॉनक्लेवचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांनी ‘को-विन’ इतर देशांसाठी खुले केले. भारत ‘को-विन’चे सॉफ्टवेअर इतर देशांना मोफत देणार आहे. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या व्हर्च्युअल परिषदेला संबोधीत करताना भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावरील विश्‍वास अधोरेखित केला.

‘को-विन’ इतर देशांसाठी खुलेभारताने लसीकरणासाठी ‘को-विन’ नावाची यंत्रणा विकसित केली आहे. याद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करण्यात येते व त्याचे सर्व माहिती एकत्रित मिळते. या यंत्रणेचे जगभरातील देशांनी कौतूक केले होते. तर कित्येक देशांनी ‘को-विन’ सारखे व्यासपिठ बनवून देण्याची मागणी भारताकडे केली होती. भारताने ‘को-विन’ सॉफ्टवेअर मागणी केलेल्या सर्व देशांना उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्याप्रमाणे सोमवारी एका व्हर्च्युअल परिषदेत हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी भारताने खुले केले.

कोरोनासारख्या संकटाने कोणताही देश कितीही शक्तीशाली असला, तरी कोरोनासारखे संकट एकट्याने हाताळू शकत नाही, हे दाखवून दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले.

leave a reply