पाकिस्तानी लष्कराने हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले

- पाकिस्तानच्या माजी राजदूतांचा गौप्यस्फोट

इस्लामाबाद – ‘गाझापट्टीतील हमास या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेला पाकिस्तानचे लष्कर प्रशिक्षण देत आहे. पाकिस्तानच्या लष्कराचे कमांडो युनिट आजही गाझात तैनात आहे’, असा खळबळ माजविणारा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी राजदूत राजा जफर उल हक यांनी केला. त्याचबरोबर यापुढेही इस्रायलविरोधी युद्धात पाकिस्तान हमासला सहाय्य करीत राहिल, अशी घोषणा राजा जफर यांनी एका कार्यक्रमात केली. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी देशाच्या संसदेत इस्रायलविरोधात धर्मयुद्ध पुकारण्याची व त्यात स्वत: सहभागी होण्याची घोषणा केली होती.

पाकिस्तानी लष्कराने हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले - पाकिस्तानच्या माजी राजदूतांचा गौप्यस्फोट‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ’ या पक्षाचे नेते आणि काही काळ इजिप्तचे राजदूत असलेले, राजा जफर यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेमध्ये आहे. यामध्ये राजा जफर यांनी गाझातील हमास आणि पाकिस्तानी लष्करातील सहकार्याची माहिती उघड केली. राजनैतिक अधिकारी असताना, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन अर्थात सध्याची वेस्ट बँकमधील फताह या पॅलेस्टिनी पक्षाचे सहसंस्थापक अबू जिहाद याची भेट झाल्याचा दाखला राजा जफर यांनी दिला.

‘1981 साली अबू जिहादशी आपली भेट झाली होती. जेव्हा कधील इस्रायलबरोबर संघर्ष होतो, तेव्हा पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण मिळालेले हमासचे कट्टरपंथी आघाडीवर असतात आणि शूरपणे संघर्ष करतात, असे अबू जिहादने सांगितले होते. पाकिस्तानी लष्कराने हमासच्या कट्टरपंथियांना प्रशिक्षण दिले होते, आत्ताही देत आहे आणि यापुढेही देत राहील’, असे राजा जफर यांनी म्हटले. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराच्या कमांडो युनिटचे तळही गाझात असल्याचा दावा राजा जफर यांनी केला.
राजा जफर यांच्या या दाव्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पण गेल्या महिन्यात इस्रायलबरोबर संघर्ष पेटलेला असताना, हमासचा कमांडर खालेद मेशाल याने व्हिडिओमधील संदेशात पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्व, अणुशास्त्रज्ञांना या संघर्षात सहाय्य करण्याचे आवाहन केले होते.पाकिस्तानी लष्कराने हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले - पाकिस्तानच्या माजी राजदूतांचा गौप्यस्फोट

पाकिस्तानमधील काही धार्मिक नेत्यांनी इस्रायलच्या विरोधात घोषणा देऊन हमासच्या मदतीसाठी घोड्यावरुन धाव घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पाकिस्तानच्या संसदमध्ये हमासबरोबरच्या लढ्यात पाकिस्तानने सहभागी व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्या अस्मा कादीर यांनी तर इस्रायलविरोधात धर्मयुद्ध पुकारा आणि याच्या यादीत सर्वात आधी माझे नाव टाका, असे केले होते.पाकिस्तानी लष्कराने हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले - पाकिस्तानच्या माजी राजदूतांचा गौप्यस्फोट

दरम्यान, पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय दहशतवादी घडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुख्यात आहेत. सयुंक्त राष्ट्रसंघाने मोस्ट वाँटेड म्हणून घोषित केलेल्या शंभरपैकी जवळपास 30 दहशतवादी पाकिस्तानातच दबा धरून असल्याचा दावा केला जातो. याशिवाय भारतविरोधी कारवाया करणार्‍या लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्याच पाठिंब्याने काम करीत आहेत. पण आता हमासशी पाकिस्तानचा संबंध जोडलेला असल्याचे नव्याने समोर आल्याने, पाकिस्तानची दहशतवादी प्रतिमा अधिकच ठळकपणे जगासमोर येत आहे.

leave a reply