चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर साऊथ चायना सीमध्ये ‘मिलिटरी हब’ उभारण्याचा फिलिपाईन्सचा इशारा

मनिला – ‘थिटु आयलँड’वर सुसज्ज ‘मिलिटरी हब’ उभारण्यात येईल, अशी घोषणा फिलिपाईन्सचे लष्करप्रमुख जनरल सिरिलितो सोबेयाना यांनी केली. या लष्करी केंद्रात चीनच्या ‘नेव्हल मिलिशिआ’सह इतर जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘हाय रिझोल्युशन नाईट कॅपेबल कॅमेरे’ बसविण्या येतील, असे फिलिपाईन्स सांगत आहे.

चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर साऊथ चायना सीमध्ये ‘मिलिटरी हब’ उभारण्याचा फिलिपाईन्सचा इशारा‘थिटु आयलंडवर फिलिपिनी लष्कराच्या हबसाठी परवानगी द्यावी, यासाठीचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांना पाठविण्यात येईल. इथे हाय रिझोल्युशन असणारे व रात्री टेहळणीची क्षमता असणारे कॅमेरे बसविण्यात येतील. फिलिपाईन्सच्या ताब्यातील बेटांनजिक सुरू असणार्‍या हालचालींवर या माध्यमातून नजर ठेवता येईल. याचा वापर साऊथ चायना सीमधील गस्त कायम ठेवण्यासाठी केंद्र म्हणून करण्यात येईल’, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल सिरिलितो सोबेयाना यांनी दिली.

चीनचा ‘नेव्हल मिलिशिआ’ व इतर जहाजांना फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातून बाहेर काढणे हा मिलिटरी हबचा मुख्य उद्देश असेल, या शब्दात लष्करप्रमुख सोबेयाना यांनी चीनला थेट इशारा दिला. फिलिपाईन्सच्या या इशार्‍यावर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. चीन व फिलिपाईन्स त्यांच्यात असणारे वाद सामंजस्याने सोडवतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या. त्याचवेळी काहीजण दोन देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर साऊथ चायना सीमध्ये ‘मिलिटरी हब’ उभारण्याचा फिलिपाईन्सचा इशाराचीन व फिलिपाईन्समध्ये साऊथ चायना सीच्या मुद्यावर असणारा वाद चांगलाच चिघळत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात चीनने आपली शेकडो मच्छिमार जहाजे फिलिपिनी हद्दीत घुसविल्यानंतर फिलिपाईन्समध्ये चीनविरोधात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात फिलिपाईन्स सरकार व लष्कराकडून साऊथ चायना सी प्रकरणात सातत्याने आग्रही भूमिका घेऊन चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे.

एप्रिल महिन्यात फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमध्ये चीनप्रमाणेच कृत्रिम बेटे उभारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनविरोधात रक्तरंजित युद्धाची शक्यता वर्तवितानाच फिलिपिनी नौदलाची गस्त थांबणार नसल्याचे बजावले होते. फिलिपाईन्सचे तटरक्षक दल तसेच टास्क फोर्सने चिनी जहाजांचे घुसखोरीचे प्रयत्नही उधळून लावले होते. तर गेल्याच आठवड्यात, चीनकडून दरवर्षी लादण्यात येणारी मासेमारीवरील बंदी फिलिपाईन्सने उघडपणे धुडकावली होती.

leave a reply