पंतप्रधानांकडून २१ दिवसांच्या लॉकडॉऊनची घोषणा

नवी दिल्ली कोरोनाव्हायरसच्या सन्क्रमणाचे चक्र तोड्ण्यासाठी मंगळवारच्या रात्री बारा वाजल्यापासून देशभरात लॉकडाउनची करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या २१ दिवसांच्या लॉकडाउनचा निर्णय घेतला नाही तर देश २१ वर्ष मागे जाईल व यामुळे होणार्या हानीची आपण कल्पनाही करू शकत नाही, असे पंतप्रधानांनी जनतेला बजावले आहे. रविवारच्या जनता कर्फ्यू पेक्षा हे २१ दिवसाचे लॉकडाउन अधिक कडक असेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

जगातील प्रगत देश देखील या साथीमुळे असहाय्य बनले आहेत. त्यामुळे स्वत:ला या साथीपासुन वाचवणे हा एकच पर्याय समोर आहे. यासाठीच लॉकडाउन अनिवार्य ठरते, ही लॉकडाउनची लक्ष्मणरेषा ओलांडून नागरीकानी घराबाहेर पडूच नये, असे कळकळीचे आवाहन पंतप्रधानांनी केले. हे २१ दिवस सांभाळत आले नाही तर आपले कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्यामुळे, पुढचे तीन आठवडे घराबाहेर पडणे विसरुनच जा, असा संदेश पंतप्रधानांनी दिला

ज्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसने प्रवेश केला, तिथल्या रुग्णांची संख्या एक लाखावर जाण्यासाठी ६७ दिवसांचा कालावधी लागला. पण पुढच्या अकरा दिवसात या देशामधील रुग्णांची संख्या दोन लाखांवर गेली आणि अवघ्या चार दिवसात या रुग्णांची संख्या आणखीन एक लाखानी वाढून तीन लाखांच्या पलिकडे गेली. त्यामुळे ह्या साथीच्या सन्क्रमणाचा वेग भयंकर असून, यापासून स्वत:ला सुरक्षित राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

या साथीच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी तसेच या अवघड काळात जनतेची सेवा करणार्या सर्वांचेच पंतप्रधानांनी आभार मानले. त्यांच्यासाठी सर्वानी मंगलकामना करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. २१ दिवसांचा कालावधी खूप मोठा आहे, पण आपल्या परिवाराच्या सूरक्षेसाठी आपल्यासमोर हा एकच मार्ग आहे. सारा देश एकजुटिने या साथीचा मुकाबला करील आणि या संघर्षात देशाचा विजय होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला अन्न धान्य, भाजीपाला, दुध इत्यादी जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे आश्वाशन दिले. तर शेतकर्यान्चा माल ग्राहकांपर्यंत पोहोचविला जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. किराणामालाच्या दुकानात भाजीपाला पोहोचवून तो ग्रहाकांना पुरविण्यावर विचार सुरू झाला आहे.

leave a reply