जगभरात पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आक्रमक निदर्शने

निदर्शनेलंडन/न्यूयॉर्क/सिडनी – शनिवारी जगभरात इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने आयोजित करण्यात आली. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या निदर्शनांमध्ये लाखो जणांनी सहभाग घेतला. यापैकी ब्रिटनमधील निदर्शनात पॅलेस्टिनी समर्थकांनी हुल्लडबाजी केल्याच्या बातम्या येत आहेत.

निदर्शनेइस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदी लागू झाल्यानंतर हमासचा नेता इस्माईल हनिया याने जगभरातील पॅलेस्टिनी समर्थकांना निदर्शने काढण्याचे आवाहन केले होते. हमास या दहशतवादी संघटनेच्या नेत्याने केलेल्या या आवाहनाला इराण, तुर्की या देशांचे समर्थन मिळाले होते. त्यानंतर शनिवारी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या पाश्‍चिमात्य देशांबरोबर इराण, इराक, सिरिया, तुर्की, लेबेनॉन, जॉर्डन, मलेशिया, पाकिस्तान या इस्लामी देशांमध्येही निदर्शने आयोजित करण्यात आली.

निदर्शनेयापैकी ब्रिटनमध्ये आयोजित निदर्शनांमध्ये सर्वाधिक दोन लाख जणांनी सहभाग घेतल्याच्या बातम्या येत आहेत. लंडनसह लॅक्स्टरशायर, नॉटिंगहम, ब्रिस्टल या शहरांमध्ये मोठी निदर्शने झाली. या निदर्शनांमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा धिक्कार करण्यात आला. तर ‘हिटलरने जे तुमच्याबरोबर केले, ते पॅलेस्टिनींसोबत करू नका’, ‘इस्रायल, नवे नाझी राष्ट्र’, ‘वंशसंहार भाग 2’ असे फलक निदर्शकांनी प्रदर्शित केले. लॅक्टरशायरमध्ये पॅलेस्टिनी निदर्शकांनी ड्रोन्सची निर्मिती करणार्‍या इस्रायली कंपनीत घुसखोरी करून तोडफोड केली.

निदर्शनेयाशिवाय ब्रिटनमधील निदर्शनात इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला. रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली. तर ब्रिटनमधील निदर्शनात सहभागी झालेल्या पाकिस्तानी निदर्शकाची स्थानिकाबरोबर शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडिओ समोर येत आहे. बलोच, पश्तू आणि हजारा समुदयावर अत्याचार करणार्‍या पाकिस्तानला इस्रायलवर टीका करण्याचा अधिकार नाही, अशी चपराक या स्थानिकाने लगावली होती. त्यानंतर पाकिस्तानी निदर्शक चक्रावल्याचे दिसत होते.

निदर्शनेब्रिटनप्रमाणे, फ्रान्स, ऑस्ट्रेलियातही इस्रायलविरोधात निदर्शने करणार्‍यांनी या देशांच्या राष्ट्रप्रमुखांवर टीका केली. यापैकी फ्रान्समधील निदर्शने हिंसक होणार नाहीत, याची काळजी घेतली होती. काही दिवसांपूर्वीच फ्रान्सने इस्रायलविरोधी निदर्शकांना हिंसक आणि प्रक्षोभक निदर्शने आयोजित करणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

दरम्यान, जगभरात इस्रायल व ज्यूद्वेषी हिंसाचार वाढत असल्याची चिंता अमेरिकेतील एडीएल या संघटनेने नुकतीच व्यक्त केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका युरोपिय देशांमध्ये इस्रायलच्या विरोधात झालेल्या या निदर्शनाचे फार मोठे पडसाद पाश्‍चिमात्य देशांमध्ये उमटणार असल्याचे दिसू लागले आहे. हमासच्या इस्रायलवरील रॉकेटहल्ल्यांचे समर्थन हे दहशतवादाचेच समर्थन ठरते, असा सूर पाश्‍चिमात्य देशांच्या राजकीय व्यवस्थेने लावलेला आहे. पाश्‍चिमात्य देश पॅलेस्टिनींच्या विरोधात नाहीत, पण हमास म्हणजे पॅलेस्टाईन नाही, याकडेही पाश्‍चिमात्य विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply