तमिळनाडूच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत ‘ट्रायका’ रायफलची निर्मिती

नवी दिल्ली – तमिळनाडूच्या तिरुचिराप्पल्ली येथील ऑर्डनन्स फॅक्टारीत छोट्या आकाराची पण सब मशिनगनपेक्षाही अतिशय प्रभावी असणार्‍या अत्याधुनिक कार्बाइनची निर्मिती करण्यात आली आहे. ‘ट्रायका’ (त्रिची कार्बाइन) असे या रायफलला नाव देण्यात आले असून गुरुवारी या रायफलचे अनावरण झाले.

तमिळनाडूच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत ‘ट्रायका’ रायफलची निर्मिती‘ट्रायका’ कार्बाइन वजनाने हलकी, कमी आवाज करणारी असून सुरक्षादलांच्या जॅकेटमध्ये राहू शकते, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार करण्यात आलेली ट्रायका रायफल 7.62 बाय 39 एमएमची आहे. वजनाने हलकी असलेली ही रायफल सध्या वापरता असलेल्या सब मशिनगच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. पायदळाच्या लढाऊ वाहनांवर तैनात जवान, हेलिकॉप्टरमधील क्रू, पॅराट्रूपर्ससह विमानतळासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी तैनात असलेल्या जवानांसाठी, विशेष कारवाईत सहभागी पोलिसांसाठी कार्बाइन उपयुक्त ठरेल असा दावा करण्यात येतो.

या रायफलच्या पुढील भागात मूझल बुस्टर बसविण्यात आले आहे. त्यामुळे गोळी झाडताना प्रकाश पडत नाही व त्याचा आवाज देखील कमी येतो. तसेच या कार्बाइनमध्ये एके-47 आणि टीएआर रायफलचे भाग देखील वापरता येऊ शकतात, अशी माहिती अधिकार्‍याने दिली आहे. या रायफलीची निर्मिती फॅक्टरीच्या संशोधन आणि विकास विभागातर्फे करण्यात आली आहे. फॅक्टरीतचे महाव्यवस्थापक संजय द्विवेदी यांच्या हस्ते ट्रायकाचे अनावर करण्यात आले.

leave a reply