डीआरडीओ’कडून ‘अल्ट्राव्हॉयलेट डिव्हाइस’ ची निर्मिती

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था ) –  कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर  “डीआरडीओ”कडून संरक्षक उपकरणे विकसित केली जात आहेत. “डीआरडीओ”कडून आता ‘ऑटोमॅटिक सॅनिटायझर’ आणि ‘अल्ट्राव्हॉयलेट डिव्हाइस’ या दोन उपकरणांची निर्मिती करण्यात आली आहे. याआधी  “डीआरडीओ”कडून बायोसूट, फेसशिल्ड, शरीर निर्जंतुकीकरणासाठी पर्सनल ‘सॅनिटाइझेशन इंक्लोजर्स’ (पीएसई) मशीन अशी उपकरणे  तयार करण्यात आली होती.

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास  संस्थेतर्फे (डीआरडीओ)  विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली असून वेगवेगळी उपकरणे तयार करण्यात येत आहेत.   डीआरडीओतर्फे आता अल्ट्राव्हायोलेट डिव्हाइस तयार करण्यात आले असून त्याच्या सहाय्याने कार्यालय आणि घरातील वस्तू खुर्च्या, फाईल्स आणि फूड पॅकेट्सचे निर्जंतुकीकरण करण्यात येऊ शकते, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले. हे उपकरण बॉक्स स्वरूपात देखील येते. त्यामाध्यमातून मोबाइल फोन, फाईल्स आणि वॉलेट यासारख्या वैयक्तिक वस्तूंचे निर्जंतुकीकरण करता येतात.  “डीआरडीओ”च्या  फायर एक्सप्लोसिव्ह अँड एनव्होर्मेन्ट सेफ्टीने   (सीएफईईएस )  या यंत्राची निर्मिती केली आहे.

याशिवाय  सीएफईईएसकडून  सॅनिटायझर डीसपेनसिंग युनिट तयार करण्यात आले . या युनिटमुळे  सॅनिटायझरचा वापर करताना या युनिटला स्पर्श करण्याची गरज नसेल. सेन्सर्समुळे  सॅनिटायझर थेट हातावर पडेल. रुग्णालय,  कार्यालये, विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रहिवासी इमारती. मॉल्स  महत्वाच्या ठिकाणी ही युनिट बसवण्यात येऊ शकतात. त्यामुळे इमारतींमध्ये प्रवेश करणार्‍यांचे हात निर्जंतुकीकरण करण्यास मदत मिळेल.  रिओट लॅब्झ प्रायव्हेट लिमिटेडच्या साहाय्याने डीआरडीओने हे युनिट तयार केले आहे.

‘डीआरडीओ’ तर्फे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या मुकाबल्यासाठी विविध प्रयोग व संशोधन करण्यात येत आहे. नुकतेच ‘व्हीआरडीई’या संरक्षण विभागाच्या प्रयोगशाळेने संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरणासाठी पर्सनल ‘सॅनिटाइझेशन इंक्लोजर्स’ (पीएसई) हे मशीन तयार केले आहे.  चेंबरमध्ये प्रवेश केल्यानंतर फुट पॅडल वापरून निर्जंतुकीकरण सुरू होते. होईल. चेंबरमध्ये प्रवेश केल्यावर, विद्युत पंपाद्वारे निर्जंतुकीकरणासाठी हायपो सोडियम क्लोराईडचे जंतुनाशक धुके तयार होते. या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येते.

दरम्यान  श्री चित्र तिरुनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी  कोरोनाव्हायरसची  चाचणी करण्यासाठी किट तयार केले असून त्यामुळे दोन तासात निदान करणे शक्य होईल असा दावा केला जात आहे. 

leave a reply