देशात दोन दिवसात १.३९ कोटी जणांचे लसीकरण

- आर्थिक उलाढाली सुरळीत होण्यासाठी जलदगतीने लसीकरण हाच पर्याय - डॉ.व्ही.के.पॉल

नवी दिल्ली – देशात लसीकरणाचे नवे धोरण लागू झाल्यानंतर दोन दिवसात विक्रमी लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा या वेगाने संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले आहे. मंगळवारी ५० लाख जणांना लसींचे डोस देण्यात आले. तेच सोमवारी ८८.१६ लाख जणांचे लसीकरण झााले होते. लसीकरणाचा वेग वाढला व नियमांचे पालन झाले, तर तिसरी लाट आपण रोखू शकतो, असा विश्‍वास नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल यांनी व्यक्त केला आहे. तसेच आर्थिक उलाढाली पुन्हा सुरळीत सुरू होण्यासाठी जलदगतीने लसीकरण हीच चावी असल्याचे डॉ. पॉल यांनी म्हटले.

देशात दोन दिवसात १.३९ कोटी जणांचे लसीकरण - आर्थिक उलाढाली सुरळीत होण्यासाठी जलदगतीने लसीकरण हाच पर्याय - डॉ.व्ही.के.पॉलदेशात मंगळवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ४२,६४० नव्या रुग्णांची नोंद झाली. ९१ दिवसानंतर प्रथमच देशात ५० हजारपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. तसेच चोवीस तासातील बळींच्या संख्या ६८ दिवसातील सर्वात कमी संख्या ठरली आहे. एका दिवसात ११६७ जणांचा मृत्यू देशात झाला. कोरोनाची परिस्थिती देशभरात सुधरताना दिसत आहे. कित्येक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच तेलंगणाही संपूर्णपणे संचार निर्बंध हटविणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. असे असले, तरी तिसर्‍या लाटेचा धोका असल्याचे वारंवार इशारे देण्यात येत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन केले, सर्व प्रकारची दक्षता घेतली, त्याचवेळी वेगाने लसीकरण केले तर आपण ही तिसरी लाट रोखू शकतो, असा ठाम विश्‍वास नीति आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांनी व्यक्त केला आहे. २१ जून सोमवारपासून देशात लसीकरणाचा नव्या धोरणानुसार लसीकरण सुरू झाले. आता १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांना मोफत लसी केंद्र सरकार पुरविणार आहे. यासाठी केंद्र सरकार लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनाच्या ७५ टक्के भाग खरेदी करणार आहे. याशिवाय खाजगी रुग्णालये व संस्थांमधूनही लसीकरण सुरू असून त्यांना उर्वरीत २५ टक्क्यांमधून लस खरेदी करण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. देशात खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

देशात दोन दिवसात १.३९ कोटी जणांचे लसीकरण - आर्थिक उलाढाली सुरळीत होण्यासाठी जलदगतीने लसीकरण हाच पर्याय - डॉ.व्ही.के.पॉलत्यामुळे नव्या धोरणाच्या पहिल्याच दिवशी जागतिक विक्रमाची नोंद झाली. एका दिवसात ८८ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण झाले, तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी सुमारे ५१ लाग जणांचे लसीकरण झाले आहे. दोन दिवसात एकूण १.३९ कोटी जणांचे लसीकरण झाल्याचे आकडेवारी समोर येत आहे. विशेष म्हणजे यातील ६४ टक्के लसीकरण ग्रामीण भागात झाले. जुलै महिन्यात हा वेग आणखी वाढलेला असेल, असा दावा केला जातो.

देशात कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षींपासून अर्थचक्र पुर्णपणे सुरळीत होऊ शकलेले नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबरनंतर बर्‍याच आर्थिक उलाढाली सुरक्षळीत होण्यास सुरूवात झाली होती. मात्र मार्च पासून पुन्हा रुग्ण वाढू लागल्यावर अर्थिक उलाढालींवर पुन्हा परिणाम झाला. आता देशातची अर्थव्यवस्था सुरळीत करायची असेल, तर वेगाने आणि जास्तीजास्त जणांचे लसीकरण हाच पर्याय आहे. सर्व व्यवसाय, उद्योग, तसेच शाळा व इतर गोष्टी तेव्हाच सुरळीत होतील, ज्यावेळी जास्तीत जास्त जणांचे लसीकरण होईल, असे डॉ. पॉल म्हणाले. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे व सहकार्य करावे. लसींबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नयेत, असे आवाहन डॉ. पॉल यांनी केले आहे.

leave a reply