भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर्स दाखल

नवी दिल्ली- भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘एमएच-60 मल्टी-रोल’ (रोमिओ) हेलिकॉप्टर्स दाखल झाले. शनिवारी अमेरिकेच्या सन दिएगोच्या नौदल तळावर अमेरिकन नौदलाने भारताकडे हे रोमिओ हेलिकॉप्टर्स सोपविले. हिंदी महासागर आणि ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात रोमिओ हेलिकॉप्टर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे वृत्त आहे. या क्षेत्रात चीनच्या हालचाली वाढत चाललेल्या असताना भारतीय नौदलाचे हे वाढते सामर्थ्य चीनच्या चिंतेत भर टाकणारे ठरते.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर्स दाखलशनिवारी अमेरिकेच्या नौदल तळावर पार पडलेल्या सोहळ्यात अमेरिकन नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल केनेथ व्हाईटसेल आणि भारतीय नौदलाचे उपनौदलप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल रवनित सिंग व अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू उपस्थित होते. अमेरिकेच्या लॉकहिड मार्टिन कंपनीने हे रोमिओ हेलिकॉप्टर्स विकसित केले आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये 24 रोमिओ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंर्दभात 2.6 अब्ज डॉलर्सचा करार पार पडला होता. भारताने गेल्या वर्षी ‘फॉरेन मिलिट्री सेल्स’ अंतर्गत अमेरिकेला 24 रोमिओ हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली होती. यानुसार पहिली दोन हेलिकॉप्टर्स अमेरिकेने भारताकडे सोपविली.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर्स दाखलया करारानुसार भारतीय नौदलाच्या वैमानिक आणि कर्मचार्‍यांना रीतसर प्रशिक्षण देण्यात आले आहे. फोर्थ जनरेशनचे हे रोमिओ हेलिकॉप्टर्स ‘अँटी सबमरिन वॉरफेअर’ आणि ‘अँटी सरफेस वॉरफेअर’ अर्थात पाणबुडीविरोधी युद्धासाठी अतिशय प्रभावी ठरतील. या रोमिओ हेलिकॉप्टर्समध्ये ‘बोईंग-पी 8 आय’सोबत उडण्याची क्षमता आहे. यामुळे शत्रूदेशाच्या पाणबुडीचा माग काढणे सोपे जाईल. शिवाय भारतासाठी या हेलिकॉप्टर्समध्ये काही आधुनिक बदल करण्यात आले आहेत. या संरक्षणविषयक करारामुळे भारत आणि अमेरिकन नौदलाचे सहकार्य वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. तसेच यामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होईल.

leave a reply