रशियाने सीमेवरुन सैन्य माघारी घ्यावे

-जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल

 बर्लिन – युक्रेनच्या सीमेजवळ तैनात केलेल्या आपल्या जवानांना रशियाने माघारी घ्यावे, असे आवाहन जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी केले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर फोनवरुन झालेल्या संभाषणात मर्केल यांनी ही मागणी केली. यामुळे युक्रेनच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी होईल, असा दावा जर्मनी करीत आहे.

जर्मनीच्या चॅन्सेलरने केलेल्या या मागणीची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दखल घेतल्याचे रशियन सरकारने जाहीर केले. पण युक्रेनचे सरकारच डोन्बासमध्ये रशियाला चिथावणी देत आहे. त्यामुळे युक्रेनच्या या चिथावणीला उत्तर म्हणून ही सैन्यतैनाती केल्याचे रशियाने स्पष्ट केले. त्यामुळे युक्रेनच्या सैन्यमाघारीशिवाय रशिया येथून माघार घेणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जर्मनीच्या चॅन्सेलरना स्पष्टपणे सांगितल्याच्या बातम्याही येत आहेत.

leave a reply