अफगाणिस्तानातून आक्रमण झाले तर रशिया ताजिकिस्तानचे संरक्षण करील

- रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

मॉस्को – ‘उत्तर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर जात असून तालिबान खरोखर यावर नियंत्रण मिळवू शकत नसल्याचे दिसत आहे. तरीही शेजारी देशांवर हल्ले केले जाणार नाहीत, या आपल्या वचनांचा तालिबान आदर करील अशी अपेक्षा आहे. मात्र यानंतरही तशीच परिस्थिती निर्माण झाली तर रशिया अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांपासून ताजिकिस्तानची सुरक्षा करील’, अशी घोषणा रशियाचे उपपराष्ट्रमंत्री आंद्रेई रूदेन्को यांनी केली.

अफगाणिस्तानातून आक्रमण झाले तर रशिया ताजिकिस्तानचे संरक्षण करील - रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांची घोषणारशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानातील ताजिक दहशतवाद्यांबरोबर सहकार्य प्रस्थापित केले आहे. हे दहशतवादी ताजिकिस्तानच्या सीमेवर घुसखोरी करण्याच्या किंवा या भागात हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जातो. तालिबानच्या राजवटीविरोधात भूमिका घेणार्‍या आणि तालिबानविरोधात लढा देणार्‍या अमरुल्ला सालेह व अहमद मसूद यांना आश्रय देणार्‍या ताजिकिस्तानला धडा शिकविण्यासाठी हा हल्ला केला जाऊ शकतो, असे रशियन माध्यमांचे म्हणणे आहे.

तर काही आठवड्यांपूर्वी तालिबानने देखील ताजिकिस्तानच्या सीमेजवळ ‘मन्सूरी इस्लामिक एमिरात आर्मी’तील हजारो दहशतवादी रवाना केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तालिबानमधील हा गट आत्मघाती हल्ल्यांसाठी ओळखला जातो. अफगाणिस्तानातून आक्रमण झाले तर रशिया ताजिकिस्तानचे संरक्षण करील - रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांची घोषणाअशा परिस्थितीत तालिबानने मन्सूरी तसेच ताजिक दहशतवाद्यांची ताजिकिस्तानच्या सीमेजवळ तैनाती करून मोठ्या घातपाताची तयारी केल्याचा दावा केला जातो. रशियाने याची गंभीर दखल घेऊन ताजिकिस्तानच्या संरक्षणासाठी आपले लष्कर उतरविण्याचे संकेत दिले आहेत. रशिया आणि सोव्हिएत रशियन सदस्य देशांमध्ये झालेल्या ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ’ या कराराअंतर्गत तसेच द्विपक्षीय सहकार्याअंतर्गत रशिया ताजिकिस्तानची सुरक्षा करील, असे उपपरराष्ट्रमंत्री रूदेन्को म्हणाले. ताजिकिस्तानच्या दुशान्बेमध्ये रशियाचा मोठा लष्करी तळ आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच रशियाने ताजिकिस्तानसोबत अफगाणिस्तानच्या सीमेजवळील युद्धसरावात सहभाग घेतला होता.

दरम्यान, रशियाने पुढच्या आठवड्यात तालिबाला चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. त्याआधी रशियाने ताजिकिस्तानच्या सुरक्षेवरुन तालिबानला इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply