चीनच्या सहकार्याने सौदी छुपा अणुकार्यक्रम राबवित आहे

अमेरिकी माध्यमांची माहिती

वॉशिंग्टन – आखातातील अमेरिकेचा जवळचा सहकारी देश असलेला सौदी अरेबिया चीनच्या सहकार्याने छुपा अणुकार्यक्रम राबवित असल्याची माहिती समोर येत आहे. ’द वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकी वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली. यानंतर अमेरिकी यंत्रणांनी सौदीच्या या छुप्या आण्विक सहकार्याची चौकशी सुरू असल्याचा दावा आणखी एका वर्तमानपत्राने केला आहे. याआधी सौदीने इराणच्या विरोधात अण्वस्त्रसज्ज होण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर सदर घडामोडींकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

चीनच्या सहकार्याने सौदी छुपा अणुकार्यक्रम राबवित आहेसौदी अरेबियाच्या वायव्येकडील ’अल उला’ या शहरात हा छुपा अणुकार्यक्रम राबवित जात असल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे. या प्रकल्पात युरेनियमचे संवर्धन सुरू असून चीनच्या दोन कंपन्या यासाठी सौदी अरेबियाला सहाय्य करीत आहेत. २०१२ साली सौदी आणि चीनमध्ये झालेल्या कराराप्रमाणे, ’चायना नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन’ आणि ’चायना न्यूक्लिअर इंजिनियरिंग ग्रुप कॉर्पोरेशन’ या दोन कंपन्या सौदीला आण्विक सहकार्य पुरवित आहेत. या अणुकार्यक्रमाद्वारे सौदीने अणुबॉम्ब निर्मितीचा पर्याय मोकळा ठेवल्याचा दावा सदर वर्तमानपत्राने केला आहे.

सौदीचा हा छुपा अणुकार्यक्रम इराणला आव्हान देणारा असून यासाठी दोन वर्षांपूर्वी सौदीने केलेल्या घोषणेकडे सदर वर्तमानपत्राने लक्ष्य वेधले. “इराणने अणुबॉम्बची निर्मिती केली तर सौदी देखील फार काळ मागे राहणार नाही व अणुबॉम्बची निर्मिती करील”, असा इशारा सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी दिला होता. त्यामुळे युरेनियमच्या संवर्धनाबाबत सौदीच्या सुरू असलेल्या हालचाली गंभीर असल्याचे या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. या अमेरिकी वर्तमानपत्राने काही अधिकार्‍यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीमुळे सौदीच्या छुप्या अणुकार्यक्रमाची चौकशी होऊ शकते.

चीनच्या सहकार्याने सौदी छुपा अणुकार्यक्रम राबवित आहे’द न्यूयॉर्क टाईम्स’ या आणखी एका अमेरिकी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी सौदीच्या या अणुकार्यक्रमाची चौकशी सुरू केल्याचे म्हटले आहे. तसेच हे आण्विक सहकार्य करुन सौदीने चीनबरोबरच्या इतर धोक्यांना आमंत्रित केल्याचा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. तर अल-उला प्रकल्पात युरेनियमचे संवर्धन सुरू केल्याचा दावा सौदीने फेटाळला आहे. पण युरेनियमच्या संवर्धनासाठी चीनच्या कंपन्यांबरोबर करार केल्याची माहिती सौदीने दिली.

leave a reply