अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेला चीनच्या सायबर हल्ल्यांपासून गंभीर धोका

- सीआयएच्या संचालकांचा इशारा

अंतर्गत सुरक्षेलावॉशिंग्टन – ‘२१ व्या शतकात चीन हा अमेरिकेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. अमेरिकेच्या स्थानिक यंत्रणांपासून ते अंतर्गत सुरक्षेसंबंधी अतिशय संवदेनशील यंत्रणांपर्यंत चीन सायबर हल्ले चढवू शकतो. त्यामुळे चीनच्या हेरगिरीपासून अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेला गंभीर धोका आहे’, असा इशारा अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्स यांनी दिला. सीआयएच्या संचालकांप्रमाणे अमेरिकेच्या इतर गुप्तचर यंत्रणा आणि अभ्यासगटही चीनच्या सायबर हल्ल्यांपासून धोका असल्याचे इशारे देत आहेत.

गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीवर झालेल्या सायबर हल्ल्याचे धागेदोरे चीनशी जोडलेले होते. या सायबर हल्ल्यानंतर अमेरिकेने इमर्जन्सी अलर्ट जारी केला होता. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा तसेच पायाभूत अंतर्गत सुरक्षेलासुविधांशी सदर कंपनी जोडलेली असल्यामुळे या अलर्ट जारी करणे भाग पडले होते.

याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेच्या सरकारी, खासगी कंपन्या आणि पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यातही चीन सहभागी होता. ‘मँडियंट’ या अमेरिकी सायबर सुरक्षेशी संबंधित कंपनीने या आरोप केला आहे. तर उताहस्थित आणखी एका सायबर सुरक्षा कंपनीने देखील अमेरिकेच्या संरक्षण उद्योगाशी संबंधित कंपन्यांवर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये देखील चीनसंबंधित हॅकर्स सहभागी असल्याचा ठपका ठेवला.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, चीनकडून अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेला गंभीर धोका असल्याचा इशारा सीआयएचे संचालक देत आहेत. पण चीनने अमेरिकेचा हा आरोप फेटाळला असून अमेरिकाच सायबर हॅकिंगमधील सर्वात मोठे साम्राज्य असल्याचा प्रत्यारोप केला आहे.

leave a reply