…तर आम्ही चीनमधील ‘ताईशान’ अणुप्रकल्प बंद केला असता

- फ्रेंच कंपनीचा इशारा

अणुप्रकल्पपॅरिस/बीजिंग – चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतातील ‘ताईशान’ अणुप्रकल्पात निर्माण झालेली समस्या अत्यंत गंभीर होती. शक्य असते तर आम्ही हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला असता, असा इशारा फ्रेंच कंपनी ‘ईडीएफ’ने दिला. गेल्या महिन्यात ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. पण चिनी यंत्रणांनी सारे काही आलबेल असल्याचे निवेदन देऊन हे प्रकरण दडपण्याच प्रयत्न केला होता. मात्र फ्रेंच कंपनी ‘ईडीएफ’ने दिलेल्या इशार्‍यामुळे चिनी राजवटीची लपवाछपवीचे धोरण पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतात ‘ताईशान’ अणुप्रकल्प असून त्यात दोन अणुभट्ट्या कार्यरत आहेत. हा प्रकल्प चीन व फ्रान्सने संयुक्तरित्या उभारला आहे. फ्रान्सच्या ‘फ्रॅमअ‍ॅटम’ या कंपनीने प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून देखभालीचीही जबाबदारी या कंपनीकडेच आहे. ही कंपनी जगातील आघाडीची अणुऊर्जा कंपनी असणार्‍या ‘ईडीएफ’ या फ्रेंच कंपनीची उपकंपनी आहे.

अणुप्रकल्पगेल्या महिन्यात ‘फ्रॅमअ‍ॅटम’ या कंपनीने अमेरिकी यंत्रणांशी संपर्क साधून अणुप्रकल्पातून ‘फ्युजन गॅस’ची गळती होत असून सुरक्षेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो, असे बजावले होते. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जबरदस्त खळबळ उडाली होती. अमेरिकी माध्यमांनी सदर घटनाक्रम 1986 साली चेर्नोबिलमध्ये झालेल्या दुर्घटनेप्रमाणे असल्याचा दावा केला होता. आता या मुद्यावर फ्रेंच कंपनीकडून इशारा समोर आल्याने चिनी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

‘ईडीएफ’ने आपल्या निवेदनात चिनी कंपनीला प्रकल्पातील सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती दिली होती, असे म्हटले आहे. फ्रान्समध्ये अशी घटना घडली असती तर प्रकल्प तात्काळ बंद करून त्याची पूर्ण तपासणी व चौकशी केली असती, असा सल्लाही दिला होता. चिनी यंत्रणांनी प्रकल्पाबाबत कोणतीही शंका निर्माण होऊ अणुप्रकल्पनये म्हणून काही तांत्रिक निकष अचानक बदलल्याचा आरोपही फ्रेंच कंपनीने केला. निवेदनाच्या अखेरीस सदर प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार चिनी कंपनीकडे होता, याकडेही लक्ष वेधले आहे.

अणुक्षेत्रातील एक जबाबदार कंपनी म्हणून प्रकल्प बंद करून चौकशी करणे योग्य ठरले असते, असेही ‘ईडीएफ’ने बजावले. ‘ईडीएफ’सारख्या आघाडीच्या व जबाबदार कंपनीकडून जाहीर करण्यात आलेले निवेदन आणि त्यातील इशारा चिनी राजवटीचे पितळ उघडे पाडणारा ठरला आहे. प्रकल्पात समस्या उद्भवली असताना चीनने त्यासंदर्भात आलबेल असल्याचे निवेदन देण्यापलिकडे फारशी दखल घेतली नव्हती. अमेरिकी माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरही चिनी यंत्रणांनी फ्रेंच कंपनीवर दडपण आणून त्यांना ‘परफॉर्मन्स इश्यू’चा उल्लेख करण्यास भाग पाडले होते. चीनच्या प्रसारमाध्यमांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता फ्रेंच कंपनीने विस्तृत निवेदन देणे ही बाब चीनला चांगलीच अडचणीत आणणारी ठरु शकते.

leave a reply