दक्षिण कोरियाने अमेरिका-चीनच्या वादात पडू नये

- चीनच्या राजदूतांचा इशारा

सेऊल/बीजिंग – दक्षिण कोरियाने शीतयुद्धकालिन मानसिकता सोडून अमेरिका व चीनमधील वादांमध्ये पडणे टाळावे, असा इशारा चीनच्या राजदूतांनी दिला आहे. चीन व दक्षिण कोरियामधील गेल्या तीन दशकांचा संबंधांचा विचार करून, साऊथ चायना सी व तैवानसारख्या मुद्यांवर चीनची भूमिकाही समजून घ्यावी, असेही राजदूत शिंग हायमिंग यांनी बजावले. चिनी राजदूत दक्षिण कोरियाला धमकावित असतानाच, नजिकच्या काळात दक्षिण कोरिया चीनला लक्ष्य करणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करु शकतो, असे वृत्त अमेरिकी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

दक्षिण कोरियाने अमेरिका-चीनच्या वादात पडू नये- चीनच्या राजदूतांचा इशारागेल्या महिन्यात दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी अमेरिकेला भेट दिली होती. या दौर्‍यात, अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर तंत्रज्ञान व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवित असल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान झालेल्या बैठकीत चीनशी संबंधित विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली होती. दोन्ही देशांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात, साऊथ चायना सी तसेच तैवानचा उल्लेख करण्यात आला होता.

दक्षिण कोरियाने साऊथ चायना सी व तैवानबाबत घेतलेल्या भूमिकेने चीन अस्वस्थ झाला असून चिनी राजदूतांनी दिलेला इशारा त्याचाच भाग दिसत आहे. ‘सर्वसाधारणपणे चीन व दक्षिण कोरियामधील संबंध चांगल्या दिशेने वाटचाल करीत आहेत. पण त्यात काही समस्याही असू शकतात. दक्षिण कोरियाने चीनबरोबरील तीन दशकांच्या संबंधांचा विचार करता शीतयुद्धकालिन मानसिकतेच्या नादी लागू नये.दक्षिण कोरियाने अमेरिका-चीनच्या वादात पडू नये- चीनच्या राजदूतांचा इशारा

साऊथ चायना सी व तैवानसारख्या मुद्यांवरील चीनची भूमिका दक्षिण कोरियाने समजून घ्यावी’, असे राजदूत शिंग हायमिंग यांनी बजावले. राजदूत हायमिंग यांच्यापाठोपाठ चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही दक्षिण कोरियाला अमेरिकेच्या मुद्यावरून इशारा दिला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी नुकताच दक्षिण कोरियाच्या मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे ‘इंडो-पॅसिफिक’मधील धोरण व त्याला दक्षिण कोरियाने दिलेले समर्थन यावर नाराजी व्यक्त केली. गेल्या महिन्यात अमेरिका व दक्षिण कोरियाने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात, ‘क्वाड’चा उल्लेख करून ही आघाडी महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले होते.दक्षिण कोरियाने अमेरिका-चीनच्या वादात पडू नये- चीनच्या राजदूतांचा इशारा

दरम्यान, दक्षिण कोरिया नजिकच्या काळात चीन व रशियासह इतर देशांना लक्ष्य करणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करु शकतो, असा दावा ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने केला आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या मर्यादेवरील बंदी उठविल्याचे गेल्याच महिन्यात जाहीर केले होते. त्यामुळे आता दक्षिण कोरिया दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती सुरू करील व ही बाब अमेरिकेसाठी हितकारक ठरु शकते, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य व उत्तर कोरियाची आण्विक क्षमता यांचा विचार करता ही गोष्ट निर्णायक ठरु शकते, असे विश्‍लेषकांचे म्हणणे असल्याचे ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले आहे.

leave a reply