गिलगिट बाल्टिस्तान व मुजफ्फराबादपर्यंत देशाचे 80 टक्के भौगोलिक क्षेत्र मान्सूनने व्यापले – भारतीय हवामानखाते

गिलगिट बाल्टिस्तानमुंबई/नवी दिल्ली – 3 जून रोजी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दहा दिवसात देशातील 80 टक्के भौगोलिक क्षेत्र व्यापले आहे. तर येत्या दोन दिवसात दिल्लीमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. गिलगिट बाल्टिस्तान व मुजफ्फराबाद या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये देखील मान्सून दाखल झाल्याचे हवामानखात्याने अधोरेखित केले आहे. गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असल्याचे भारताचे स्पष्ट धोरण आहे. याअंतर्गतच गेल्या वर्षीपासून हवामानखात्याने रेडीओद्वारे हवामानाचा अंदाज व स्थिती जाहीर करण्यास सुरूवात केली होती. तर यावर्षी मे महिन्यापासून हवामानखात्याने पीओके व गिलगिट बाल्टिस्तानचा आपल्या दैनंदिन बुलेटीनमध्ये समावेश केला.

Advertisement

यावर्षी मान्सून दोन दिवसाच्या विलंबाने केरळमध्ये दाखल झाला. मात्र त्यानंतर मान्सूनने वेगाने प्रवास केला असून देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. रविवारी पंजाब आणि हरियाणामधील बर्‍याच भागात मान्सूनने हजेरी लावली. या दोन राज्यात मान्सून दाखल झाल्याने देशातील 80 टक्के भाग मान्सूनने व्यापला.

गिलगिट बाल्टिस्तानओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, बिहार, जम्म-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान व मुजफ्फराबाद या पाकिस्तानव्याप्त काश्मीरसह हरियाणाच्या काही भागात, चंदिगड आणि पंजाबच्या उत्तर भाग मान्सूनने व्यापला आहे. तर पुढील दोन दिवसात संपूर्ण पंजाबमध्ये मान्सून व्यापेल. यासह दोन ते तीन दिवसात दिल्लीमध्ये मान्सून दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

पंजाबच्या भटिंडा, फरिदकोट, होशियारपूर, अदमापूर, मक्तसर, बलाचौर, राजपुरा, लुधियाना आणि जालंधर या जिल्ह्यात मान्सून दाखल झाला. पंजाबसह, हरियाणाच्या अंबाला, हांसी, झज्जर, नारनौल, रोहतक, सिरसा, डबवालीमध्ये मान्सूनने रविवार हजेरी लावली. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. उत्तर भारतातील काही भागात 13 व 14 जूनसाठी अलर्ट घोषीत करण्यात आला होता.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात असेल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

leave a reply