तैवान, हॉंगकॉंग, झिंजियांग प्रकरणी ‘जी७’ देशांनी चीनवर कोरडे ओढले

‘जी७’लंडन/बीजिंग – हॉंगकॉंग, झिंजियांग आणि तिबेटमधील जनतेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन आणि तैवानच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावासाठी चीन जबाबदार असल्याचा ठपका जी७ देशांनी ठेवला आहे. यापैकी तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनच्या कारवाईला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा जी७ देशांनी दिला. जी७’ने तैवानबाबत केलेल्या या विधानांवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. तैवानबाबत निराधार आरोप करून जी७ देश चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत असल्याचा ठपका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला आहे.

लंडन येथे सुरू असलेल्या औद्योगिक देशांच्या जी७च्या बैठकीत चीनवर कोरडे ओढले आहेत. चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या नियमांचे पालन करीत नसल्याची टीका जी७’ने केली आहे. यासाठी जी७ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हॉंगकॉंग, तिबेट आणि झिंजियांगमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केला. झिंजियांगमधील उघूरवंशियांना छावण्यांमध्ये कैद करून चीन त्यांच्या अधिकारांचे हनन करीत असल्याचा आरोप जी७ने केला.

‘जी७’

तर ईस्ट आणि साऊथ चायना सीमधील चीनच्या आक्रमक लष्करी हालचालींचा मुद्दाही या बैठकीत मांडण्यात आला. ‘ईस्ट आणि साऊथ चायना सीमधील घडामोडींबाबत जी७ला मोठी चिंता आहे. या क्षेत्रात तसेच तैवानच्या आखातात शांतता प्रस्थापित असणे या क्षेत्राच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे’, असे आवाहन लंडनमधील बैठकीतून करण्यात आले. यापैकी तैवानच्या मुद्यावर जी७ देशांनी अधिक भर दिला.

‘तैवानच्या आखातात चीनकडून सुरू असलेल्या एकतर्फी लष्करी हालचाली या क्षेत्रातील तणाव वाढवून स्थैर्य धोक्यात आणणारे आहे. या क्षेत्राचे लष्करीकरण आणि दहशतीचे वातावरण ‘जी७’आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहे’, असे ताशेरे जी७ देशांनी ओढले. जी७ देशांनी तैवानबाबत केलेल्या विधानांवर चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जी७ देशांनी तैवानबाबत केलेल्या आरोपांना कुठलाही आधार नसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी म्हटले आहे. पण जी७ देशांनी तैवानच्या मुद्यावर टीका करून चीनच्या अंतर्गत काराभारात हस्तक्षेप केल्याचा ठपका वेंबिन यांनी ठेवला आहे. चीनच्या अंतर्गत कारभारात लक्ष देण्यापेक्षा जी७ देशांनी जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे आणि कोरोनाविरोधी लढ्याला प्राथमिकता द्यावी, असा टोला वेंबिन यांनी?लगावला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रातील आपल्या लढाऊ आणि बॉम्बर विमानांची गस्त वाढविली आहे.

leave a reply