कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करा – केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र देशातील अनेक भागात दिसत आहे. थंड हवेची ठिकाणे, बाजारपेठा व इतर ठिकाणी होणारी गर्दी आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे होत असलेल्या उल्लंघनाविरोधात चिंताजनक आहे. हे कोरोना संक्रमणाला खुले अंमत्रण आहे. त्यामुळे राज्यांनी आता कडक कारवाई करावी. या नियमांचे पालन करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहे.

कोरोना प्रतिबंधकभारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा वारंवार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. जगात कित्येक देशात कोरोनाची नवी लाट आली आहे. जागतिक अरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकत्याच प्रसिद्ध आपल्या साप्तहिक अहवालात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याकडे लक्ष वेधले आहे. 5 जुलैपासून 11 जुलैच्या आठवड्यात कोरोनाचे 30 लाख नवे रुग्ण जगभरात आढळले असून 55 हजार जणांचा बळी गेला आहे. याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत नवे रुग्ण आणि मृत्यू याचे प्रमाण अनुक्रमे 11 टक्के व तीन टक्क्यांने जास्त आहे. याआधीचे 9 आठवडे जगभरात रुग्णांमध्ये घट दिसून येत होती. या पार्श्‍वभूमीवर डब्ल्यूएचओने भारत आणि ब्राझिल सारख्या देशांना इशारा दिला आहे. सध्या जगात सर्वाधिक रुग्ण हे ब्राझिलमध्ये आढळत आहेत. त्यानंतर भारत, इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. मात्र भारतात रुग्णसंख्येत घट नांेंदविण्यात येत आहे. पण नव्या लाटेचा धोका कायम आहे.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होताना दिसत नाही. प्रवासी वाहतूक वाहने, बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना दिसत नाही, असे भल्ला म्हणाले. लसीकरणाने वेग घेतला आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यामुळे कोरोना कमी होत आहे या भ्रमात राहून चालणार नाही. सर्वांनी नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे भल्ला म्हणाले.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी राज्यांनी निर्बंध हटविले आहेत. मात्र हे निर्बंध हटविताना काळजी घ्या. सध्या पॉझिटिव्ह दर घसरत असताना भविष्यात पुन्हा तो वाढणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. राज्यावर मोठी जबाबदारी आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे नियमांचे अंमलबजावणीवर भर द्या. प्रसंगी या नियमांच्या अंमलबाजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई करा, असे भल्ला यांनी राज्यांना सांगितले आहे.

leave a reply