तालिबानने शरण आलेल्या 22 अफगाणी जवानांना ठार केले

शरणकाबुल – अफगाणिस्तानच्या फरयाब प्रांतात तालिबानसमोर शरण गेलेल्या लष्कराच्या 22 जवानांना तालिबानने दयामाया न दाखविता ठार केले. तालिबानच्या या अमानुष कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तालिबानवर जगभरातून टीका होत आहे.

शरणअमेरिकेच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये फरयाब प्रांतातील दौलत अबाद शहरात तालिबानने अफगाणी लष्कराच्या 22 कमांडोंना ठार केल्याचा दावा केला. 16 जून रोजी दौलत अबाद शहरात अफगाणी जवान आणि तालिबानमध्ये जोरदार संघर्ष पेटला होता. पण काही काळानंतर अफगाणी जवानांकडील दारुगोळा संपल्यानंतर तालिबानसमोर शरण येण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नव्हता.

तालिबानने देखील शरण येण्याचे आवाहन केल्यानंतर, अफगाणी जवानांनी शस्त्रे सोडून तालिबानसमोर गेले. पण पुढच्याच मिनिटात तालिबानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून या जवानांची हत्या केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, तालिबानच्या या हल्ल्यांना घाबरून अफगाणी जनता आणि जवानांनी शेजारी देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी धाव घेतल्याच्या बातम्या आहेत.

leave a reply