चिनी ड्रोन्सच्या खरेदीवरून अमेरिकेच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी बायडेन प्रशासनाला फटकारले

वॉशिंग्टन/बीजिंग – बायडेन प्रशासनाकडून करण्यात येणारी चिनी ड्रोन्सची खरेदी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक बाब ठरते, असा इशारा अमेरिकेचे माजी गुप्तचर प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी दिला. अशा निर्णयातून राष्ट्राध्यक्ष बायडेन व प्रशासन चीनबाबत सौम्य भूमिका घेत असल्याचे दिसून येेते, अशा शब्दात रॅटक्लिफ यांनी बायडेन यांना फटकारले आहे. अमेरिकी प्रशासनाचा भाग असलेल्या ‘सिक्रेट सर्व्हिस’ तसेच प्रमुख तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) चिनी कंपनीची ड्रोन्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

A DJI Technology drone flies during a demonstration in Shenzhen, China, in 2014. DJI sells the majority of Chinese-made drones bought in the United States.अमेरिकेतील सत्ताबदलानंतर नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून चीनविरोधात सौम्य धोरण राबवायचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार बायडेन यांनी चीनविरोधातील अनेक निर्णयांचा फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. काही महिन्यांपूर्वी, चीनच्या लष्कराशी निगडीत असणार्‍या कंपन्यांविरोधातील कारवाई राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लांबणीवर टाकली होती. व्यापार, गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातही अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने घेतलेले काही चीनविरोधी निर्णय मागे फिरविण्यात आले होते. ड्रोन्सची खरेदीही त्याचाच भाग दिसत आहे.

‘चिनी ड्रोन्स पुरविणार्‍या कंपन्या चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी जवळीक साधून असल्याचे समोर आले होते. त्यामुळे २०१७ सालीच अमेरिकेच्या प्रशासनाने चिनी ड्रोन्स खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर २०२१ मध्ये बायडेन प्रशासनाने चिनी ड्रोन्सची खरेदी करणे मूर्खपणाची बाब ठरते. चिनी ड्रोन्स अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत’, अशा शब्दात रॅटक्लिफ यांनी बायडेन प्रशासनावर टीकास्त्र सोडले.

चिनी ड्रोन्सच्या खरेदीवरून अमेरिकेच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी बायडेन प्रशासनाला फटकारलेचिनी ड्रोन्सचे तंत्रज्ञान अमेरिकी ड्रोन्सच्या तोडीचे नसल्याकडेही माजी गुप्तचर प्रमुखांनी लक्ष वेधले. ‘बायडेन प्रशासना चीन हा शत्रू नाही, तर स्पर्धक आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी चीनसंदर्भात सौम्य भूमिका स्वीकारण्यात येत आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनवर विश्‍वास ठेवता येणार नाही, हे स्पष्ट झाले असतानाही सुरक्षेसाठी हानिकारक ठरतील, असे निर्णय घेतले जात आहेत’, असा आरोपही रॅटक्लिफ यांनी केला.

अमेरिकेच्या संसदेने चिनी ड्रोन्सवर बंदी घालणारे विधेयक २०१९ साली मंजूर केले आहे. मात्र त्यात काही अपवाद ठेवण्यात आले असून त्याचा फायदा उचलून बायडेन प्रशासनाने चिनी ड्रोन्सची खरेदी सुरू केल्याचे समोर येत आहे. व्हाईट हाऊससह बायडेन प्रशासनातील प्रमुख यंत्रणांनी या मुद्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही खरेदी अधिक वादाव्या भोवर्‍यात सापडण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या चार वर्षात अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधात आक्रमक निर्णयांचा धडाका लावला होता. व्यापारी लूट, हेरगिरी, तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्व, शिक्षणसंस्थांमधील घुसखोरी व गुंतवणूक अशा अनेक मुद्यांवर ट्रम्प प्रशासनाने एकापाठोपाठ एक आदेश काढून चीनची कोंडी करण्यास सुरुवात केली होती. या कारवाईने अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेवर तीव्र टीकास्त्र सोडताना प्रत्युत्तराचे इशारेही दिले होते.

leave a reply