तालिबानने चार प्रवासी विमानांना ओलिस धरले

विमानांना ओलिसकाबुल – सुमारे एक हजार प्रवाशांना घेऊन जाणार्‍या चार विमानांचे उड्डाण तालिबानने रोखले आहे. या कारवाईचे कारण तालिबानने जाहीर केलेले नाही. पण अफगाणिस्तानच्या मझार-ए-शरिफ विमानतळावर तालिबानने विमानांना ओलिस धरल्याची टीका होत आहे. या विमानांमध्ये अफगाणी नागरिक असल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानच्या पश्‍चिमेकडील मझार-ए-शरिफ शहरातील विमानतळावर रविवारी रात्री चार विमाने उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. ही चारही विमाने अमेरिकेसाठी रवाना होणार असल्याचा दावा केला जातो. यामध्ये अमेरिकेप्रमाणेच युरोपिय आणि अफगाणी नागरिकांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. पण सदर विमाने टारमॅकवर असतानाच तालिबानने त्यांची उड्डाणाची परवानगी नाकारली व विमानांच्या भोवतील आपले सुरक्षाकडे मजबूत केले.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तालिबानकडून विमानांच्या उड्डाणाची परवानगी घेतली नसल्याचा दावा केला जातो. यामुळे तालिबानने या विमानांना परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या निष्काळजीपणामुळे किमान हजार जणांचा जीव टांगणीला लागल्याची टीका होत आहे.

leave a reply