अफगाणिस्तानच्या संघर्षात तीन लाखजण विस्थापित

- संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल

न्यूयॉर्क – गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षात सुमारे तीन लाख अफगाणी विस्थापित झाले आहेत. तर सुमारे एक कोटी ८५ लाख अफगाणींना तातडीच्या मानवतावादी सहाय्याची आवश्यकता असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या संघर्षात तीन लाखजण विस्थापित - संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवालअफगाणिस्तानातील संघर्षात नागरिकांचा भयावह संख्येने बळी जात असल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने याआधी व्यक्त केली होती. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील तातडीच्या बैठकीत भारताचे राजदूत टी. एस. तिरूमूर्ती यांनी या अहवालाची आठवण करून दिली. तसेच अफगाणिस्तानातील हा संघर्ष थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन-आयओएम’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये तीन लाख अफगाणी विस्थापित झाले. तर सुमारे ४० हजार जण दर आठवड्याला तालिबानच्या भीतीने इराणमध्ये पलायन करीत आहेत. पण इराण, पाकिस्तान या अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमध्ये देखील या निर्वासित अफगाणींबाबत तिरस्कार वाढत असल्याची चिंता ‘आयओएम’ने व्यक्त केली. अफगाणिस्तानातील या मानवी संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी तयार रहावे, असे आवाहन या अहवालात करण्यात आले आहे.

leave a reply