इराकमध्ये ‘आयएस’च्या मोठ्या दहशतवाद्याला अटक

बगदाद – ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया-आयएस’ या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख समी जसिम याला इराकच्या सुरक्षा यंत्रणेने अटक केली. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांनी समीच्या अटकेची माहिती उघड केली. त्याचबरोबर इराकच्या सुरक्षा यंत्रणेने दुसर्‍या देशात केलेल्या कारवाईत समीला ताब्यात घेतल्याचे पंतप्रधान कधीमी यांनी सांगितले. आयएसच्या आधी समीने अल कायदाचा इराकमधील नेता अबू मुसब अल-झरकावी याच्यासाठी काम केले होते.

इराकमध्ये ‘आयएस’च्या बड्या नेत्याला अटक - इराकच्या पंतप्रधानांची घोषणाइराकच्या लष्कराचे स्पेशल फोर्सेस आणि गुप्तचर यंत्रणेने काही दिवसांपूर्वी ‘क्रॉस बॉर्डर’ अर्थात त्रयस्थ देशात कारवाई करून समी जसिम अल-जुबारी याला अटक केली. गेल्या आठवड्यात इराकच्या सुरक्षा यंत्रणा समीला घेऊन इराकमध्ये दाखल झाल्या. ही कारवाई कुठल्या देशात करण्यात आली, याची माहिती इराकचे पंतप्रधान कधीमी यांनी दिलेली नाही. पण इराकमध्ये निवडणूक सुरू असताना देशाच्या लष्कराने अतिशय जटील कारवाई करुन आयएसच्या उपप्रमुखाला अटक केल्याचे पंतप्रधान कधीमी यांनी जाहीर केले.

इराकमध्ये ‘आयएस’च्या बड्या नेत्याला अटक - इराकच्या पंतप्रधानांची घोषणाइराक आणि सिरियातील आयएसच्या हल्ल्यामागे समीच होता. २०१९ साली अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात आयएसचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी हा ठार झाल्यानंतर समी हा आयएसची सूत्रे हाताळत होता. समी हा आयएसचा अर्थमंत्री देखील होता, असा दावा केला जातो. इराक-सिरियातील आयएसच्या ताब्यातील इंधन, गॅस, खनिजसंपत्ती तसेच दुर्मिळ व ऐतिहासिक शिल्पांची काळ्या बाजारात विक्री करून त्यातून मिळणारा पैसा आयएसच्या कारवायांसाठी वापरण्याची जबाबदारी समीवर होती.

इराकमध्ये ‘आयएस’च्या बड्या नेत्याला अटक - इराकच्या पंतप्रधानांची घोषणाइराक व सिरियातील दहशतवादी कारवायांमधील सहभागानंतर अमेरिकेच्या कोषागार विभागाने २०१५ साली समीला मोस्ट वॉंटेड दहशतवादी घोषित केले होते. अल कायदाचा इराकमधील प्रमुख अबू मुसब अल-झरकावी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार होईपर्यंत समी हा इराकमध्ये होता. झरकावीच्या मृत्यूनंतर समीने सिरिया गाठून अल कायदाच्या कारवाया सुरू ठेवल्या होत्या. काही वर्षानंतर तो आयएसचा प्रमुख बगदादीला सामील झाला. त्यामुळे इराकच्या सुरक्षा यंत्रणेने समीला केलेली अटक मोठी असल्याचा दावा इराकी तसेच काही आखाती माध्यमे करीत आहेत.

leave a reply