इराणच्या गस्तीनौकांवर अमेरिकन नौदलाचे वॉर्निंग शॉट्स

वॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकन पाणबुडी आणि विनाशिकांपासून अवघ्या १४० मीटर अंतरावर आलेल्या इराणच्या फास्ट अटॅक बोटींच्या दिशेने अमेरिकी विनाशिकेने तब्बल ३० वॉर्निंग शॉट्स फायर केले. होर्मुझच्या आखातात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी अमेरिकी युद्धनौकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याची टीका पेंटॅगॉनने केली. तर आपल्या गस्तीनौकांच्या दिशेने वॉर्निंग शॉट्स चालविणार्‍या अमेरिकेच्या नौदलाची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने केला. गेल्या दहा दिवसात अमेरिका व इराणच्या नौदलातील चकमकीची ही दुसरी घटना ठरते.

Advertisement

इराणच्या गस्तीनौकांवर अमेरिकन नौदलाचे वॉर्निंग शॉट्सअमेरिकेच्या पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी होर्मुझच्या आखातात अमेरिका व इराणच्या नौदलामध्ये थोडक्यात संघर्ष टळला. ‘युएसएस जॉर्जिया’ पाणबुडी व सहा विनाशिका सोमवारी पर्शियन आखाताच्या सुरक्षेसाठी या सागरी क्षेत्रातील गस्ती मोहिमेवर होत्या. यामध्ये क्षेपणास्त्र यंत्रणेने सज्ज असलेल्या ‘युएसएस मॉंटेरे’ विनाशिकेचाही समावेश होता. पाणबुडी व विनाशिकांचा ताफा होर्मुझच्या आखातानजिक येताच इराणच्या नौदलातील १३ फास्ट अटॅक गस्तीनौकांनी त्यांच्याजवळून धोकादायक प्रवास केल्याची माहिती किरबाय यांनी दिली.

इराणच्या गस्तीनौकांवर अमेरिकन नौदलाचे वॉर्निंग शॉट्सवारंवार इशारे देऊनही इराणी गस्तीनौकांनी अमेरिकी युद्धनौकांच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला होता. या गस्तीनौका १४० मीटर अंतरापर्यंत पोहोचल्यानंतर ‘युएसएस मौई’ या विनाशिकेला ३० वेळा वॉर्निंग शॉट्स चालवावे लागले, असे किरबाय म्हणाले. ‘इराणी गस्तीनौका फारच आक्रमक होऊ पाहत होत्या. म्हणून ही कारवाई करावी लागली’, असे किरबाय यांनी माध्यमांना सांगितले. अमेरिकेच्या नौदलाने इराणी गस्तीनौकांच्या या धोकादायक प्रवासाचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले.

इराणच्या गस्तीनौकांवर अमेरिकन नौदलाचे वॉर्निंग शॉट्सइराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी अमेरिकेचे हे आरोप फेटाळले. अमेरिकेच्या सात युद्धनौकांचा आपल्या गस्तीनौकांनी पाठलाग केला. पण अमेरिकेच्या युद्धनौकांनी सुरक्षित अंतरावरुन प्रवास करावा, असे आवाहन केले होते. पण अमेरिकी युद्धनौकांनी गस्तीनौकांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रिव्होल्युशनरी गार्ड्सने केला आहे. तसेच इराणी गस्तीनौकांना धमकाविण्यासाठी अमेरिकेकडून हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या, वॉर्निंग शॉट्स फायर करणे आणि चिथावणीखोर गोळीबार, अशा संकेत धुडकावणार्‍या कारवाया अमेरिकी नौदलाकडून केल्या जात होत्या, असा ठपका रिव्होल्युशनरी गार्ड्सनी ठेवला आहे.

दरम्यान, व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराबाबत चर्चा सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये पर्शियन आखातात या दोन्ही देशांच्या नौदलामध्ये चकमकी वाढल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी इराणच्या चार गस्तीनौकांनी अमेरिकी गस्तीजहाजाजवळून अवघ्या ६२ मीटर अंतरावरुन प्रवास केला होता. तर त्याआधी रिव्होल्युशनरी गार्ड्सने अमेरिकेच्या विमावाहू युद्धनौकेवरुन ड्रोन उडविल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामुळे पर्शियन आखातातील तणाव अधिकच वाढला आहे.

leave a reply