तैवानशी चर्चा करून अमेरिकेने आगीशी खेळ करता कामा नये

- चीनची आणखी एक धमकी

आगीशी खेळबीजिंग/तैपेई – अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाले आहे. अमेरिकेने तैवानबरोबरील ही अवैध चर्चा तातडीने रोखावी आणि तैवानच्या प्रश्‍नात हस्तक्षेप करण्याचे थांबवावे, असा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेने आगीशी खेळ करू नये, असे सांगून चीनने अमेरिकेला नवी धमकी दिली. इतकेच नाही तर आपला सार्वभौम अधिकारत प्रस्थापित करण्यासाठी, तैवानच्या हवाई क्षेत्रातून चीन आपल्या लढाऊ विमानांचे उड्डाण करील, असे चीनने बजावले आहे.

एकाच दिवसापूर्वी चीनची सुमारे २५ लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत शिरली होती. तैवानच्या लढाऊ विमानांनी त्यांच्या मागावर येताच, चीनची विमाने या क्षेत्रातून निसटली. पण तैवानच्या हवाई क्षेत्रात चीन सातत्याने करीत असलेली ही घुसखोरी चिंतेचा विषय बनला आहे. याच्या बरोबरीने चीन लष्करी कारवाई करून तैवान ताब्यात घेण्याच्या धमक्या देत आहे. याची गंभीर दखल अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला घ्यावी लागली. चीनने तैवानच्या विरोधात बळाचा वापर केलाच, तर ती गंभीर चूक ठरेल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले होते. तसेच अमेरिका तैवानच्या सुरक्षेसाठी बांधिल असल्याचे सांगून तैवानकडे देखील आपल्या संरक्षणाचे सामर्थ्य असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता.आगीशी खेळ

अमेरिकेच्या या इशार्‍याची आपण पर्वा करीत नसल्याचे चीन पुन्हा पुन्हा दाखवून देत आहे. मात्र अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकारी व माजी लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर, चीनचा भडका उडाल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे माजी सिनेटर ख्रिस डोड, अमेरिकेचे माजी उपपराष्ट्रमंत्री रिचर्ड आर्मिटेज आणि जेम्स स्टेईनबर्ग यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. अमेरिकेने त्वरित ही चर्चा रोखावी आणि तैवानमध्ये हस्तक्षेप करण्याचे थांबावावे, अन्यथा त्याचा अमेरिका-चीन संबंधांवर विपरित परिणाम होईल, अशी धमकी चीनने दिली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी तैवान हा चीनसाठी अत्यंत संवेदनशील विषय ठरतो, याची आठवण अमेरिकेला करून दिली. म्हणूनच अमेरिकेने आपल्या शिष्टमंडळाची तैवानबरोबर चर्चा घडवून आणून चुकीचे संदेश देऊ नये, असे लिजिआन पुढे म्हणाले. तर चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सचे संपादक हु शिजिन यांनी तर आपल्या देशाकडून तैवानच्या हवाई क्षेत्रात लढाऊ विमाने धाडली जातील,

आगीशी खेळ

असा दावा केला. याद्वारे चीनने तैवानवरील आपला सार्वभौम अधिकार सिद्ध करील, असे शिजिन यांनी म्हटले आहे.

या विमानांवर तैवानने हल्ला चढविलाच तर ती सर्वंकष युद्धाची घोषणा मानली जाईल, असे शिजिन यांनी बजावले. शिजिन यांचा दावा म्हणजे चीनकडून तैवानच्या आत्मरक्षणाच्या तयारीचा अंदाज घेण्याचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. चीनने हल्ला चढविलाच, तर तैवान अखेरपर्यंत युद्ध लढेल, असे तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले होते. तर या युद्धात तैवानचा चीनसमोर निभाव लागणार नाही, अशी धमकी ग्लोबल टाईम्सने दिली होती. पण चीनच्या या आक्रमकतेमुळे आत्तापर्यंत चीनच्या कारवायांकडे दुर्लक्ष करणार्‍या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनालाही आपली विश्‍वासार्हता टिकवण्यासाठी चीनच्या विरोधात काही पावले उचलणे भाग पडल्याचे दिसत आहे.

leave a reply