चीनबरोबरच्या युद्धात अमेरिका पराभूत होईल

- जपानमधील युद्धसरावामुळे अस्वस्थ झालेल्या चीनचा इशारा

बीजिंग – जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धसरावामुळे चीनची बेचैनी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. ‘या युद्धसरावाचे आयोजन करून अमेरिका चीनला आव्हान देत आहे. पण येत्या काळात अमेरिकेने चीनच्या विरोधात युद्ध पुकारले तर चीनच्या संरक्षणदलासमोर अमेरिकेचा निभाव लागणार नाही आणि या युद्धात अमेरिकेचा पराभव होईल’, असा इशारा चीनच्या मुखपत्राने दिला. यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने युद्धसरावाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये तैवानचा ताबा घेण्यासाठी सराव केला जात असल्याचे दाखविण्यात आले आहे.

चीनबरोबरच्या युद्धात अमेरिका पराभूत होईल - जपानमधील युद्धसरावामुळे अस्वस्थ झालेल्या चीनचा इशारागेल्या आठवड्यात जपानच्या क्युशू भागात ‘‘जीने डी’आर्क २१’’ हा सराव सुरू झाला. यामध्ये जपानबरोबर अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया अशा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाही देशांचे लष्कर सहभागी झाले आहेत. या युद्धसरावात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियांच्या विनाशिका व पाणबुड्या सामील झाल्या आहेत. साधारण आठवडाभर चालणारा हा युद्धसराव चीनसाठी इशारा असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी केला होता. गरज पडली तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आपले मित्रदेश या क्षेत्रात दाखल होऊ शकतात, हा सिग्नल चीनला देण्यासाठी अमेरिका व जपानने या युद्धसरावाचे आयोजन केल्याचे बोलले जात होते.

चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने याची दखल घेऊन अमेरिका आणि मित्रदेशांना धमकावले. या युद्धसरावाद्वारे चारही देश आपल्या सामर्थ्याचा अपव्यय करीत आहे. सागरी मालवाहतूकीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ऑस्ट्रेलिया आणि युरोपिय देश या क्षेत्रात युद्धनौका रवाना करून चीनला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी अमेरिका आपल्या आणखी काही मित्रदेशांनाही या क्षेत्रात आमंत्रित केले आहे. हे युरोपिय देश देखील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्या युद्धनौका रवाना करीत आहे. याने चीनचे काहीही वाकडे होणार नसल्याचा दावा चीनच्या सरकारी मुखपत्राने केला.चीनबरोबरच्या युद्धात अमेरिका पराभूत होईल - जपानमधील युद्धसरावामुळे अस्वस्थ झालेल्या चीनचा इशारा

येत्या काळात चीनविरोधातील अमेरिका आणि युरोपिय देशांची ही आघाडी फार काळ टिकणार नाही. अमेरिकेने ईस्ट व साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या विरोधात युद्ध पुकारले तर चीनच्या संरक्षणदलांसमोर अमेरिकेचा निभाव लागणार नाही, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला. त्याचबरोबर अमेरिका आणि मित्रदेशांच्या लष्करी आघाडीला पराभूत करण्यासाठी चीनच्या लष्कर, नौदल आणि हवाईदलाचे सामर्थ्य पुरेसे ठरेल, अशा बढाया चिनी मुखपत्राने मारल्या आहेत. तर अमेरिका चीनला आण्विक धमक्या देण्याची हिंमत करणार नाही, कारण चीन देखील अण्वस्त्रसज्ज आहे, अशी धमकीच ग्लोबल टाईम्सने दिली.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी अमेरिका आपल्या नौदलातील ‘पहिले आरमार’ पुनरूज्जीवित करण्यासाठी गांभीर्याने विचार करीत आहे. हे पहिले आरमार अर्थात फर्स्ट फ्लिट १९४३ ते १९७३ या काळात पश्‍चिम पॅसिफिक महासागर क्षेत्रात सक्रीय होते. त्यानंतर सदर आरमार अमेरिकी नौदलाच्या सेवेतून निवृत्त करण्यात आले होते. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाविरोधात तैनातीसाठी अमेरिकेचे नौदल हे आरमार पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अमेरिकी नौदलाचे माजी प्रमुख केनिथ ब्रेथवेट यांनी यासंबंधीचा प्रस्ताव दिला आहे.

 

leave a reply