अमेरिकी शस्त्रास्त्रांचा वापर करून तालिबानने विशेष लष्करी पथके उभारली

विशेष लष्करी पथकेकाबुल – अमेरिकी लष्कराने घाईघाईत अफगाणिस्तानातून घेतलेल्या माघारीचा सर्व प्रकारे फायदा उचलण्याचे प्रयत्न तालिबानकडून सुरू आहेत. अमेरिकी लष्कराने अफगाणिस्तानात ठेवलेली शस्त्रे व प्रगत यंत्रणांचा आधार घेऊन तालिबानने ‘स्पेशल फोर्सेस’ची उभारणी केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. तालिबानचे हे स्पेशल फोर्सेस राजधानी काबुलमध्ये गस्त घालत असल्याचेही सांगण्यात येते.

‘बद्री 313’ असे तालिबानच्या या स्पेशल युनिटचे नाव असून त्यांचा संपूर्ण पोशाख परदेशी सैनिकांप्रमाणे आहे. त्यात अमेरिकी ‘एम4 रायफल’, चिलखत, ‘टॅक्टिकल रेडिओ’, हेल्मेट, ‘नाईट व्हिजन गॉगल्स’ व सुसज्ज ‘हमवी’ वाहनाचा समावेश आहे. अफगाणिस्तान ताब्यात घेताना तालिबानने अमेरिकी लष्कर तसेच अफगाणी लष्कराचे तळ ताब्यात घेतले होते. या तळावरील शस्त्रे व इतर प्रगत यंत्रणा ताब्यात घेऊन तालिबानने आपले स्पेशल युनिट तयार केल्याचे समोर येत आहे.

यासंदर्भातील फोटोग्राफ्स व व्हिडिओज तालिबानकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यात स्पेशल फोर्सेस इतर देशांच्या लष्करी युनिटप्रमाणे प्रशिक्षण घेत असल्याचेही दाखविण्यात आले आहे.

leave a reply