अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांची पाकिस्तानला सणसणीत चपराक

उपराष्ट्राध्यक्षकाबुल/इस्लामाबाद – तालिबान अफगाणिस्तानात दाईश अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेला थारा देणार नाही, असा विश्‍वास पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबानबाबत केलेल्या विधानांची दखल घेतली. तालिबानने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना ही माहिती कधी दिली? असा खरमरीत प्रश्‍न उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी विचारला. तसे तालिबानच्या ‘क्वेट्टा शूरा’ची पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय ‘जीएचक्यू’मध्ये कधी बैठक कधी पार पडली, अशी विचारणाही अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी केली.

काही दिवसांपूर्वी कुरेशी यांनी आपण तालिबानचे प्रवक्ते नसल्याचे म्हटले होते व पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनीही पाकिस्तान तालिबानच्या वतीने बोलणार उपराष्ट्राध्यक्षनसल्याचे स्पष्ट केले होते. याद्वारे तालिबान अफगाणिस्तानात घडवित असलेल्या रक्तपाताशी आपला संबंध नसल्याचा संदेश पाकिस्तानचे सरकार देऊ पाहत आहे. मात्र हे दावे ठोकत असताना, तालिबान आपल्या नियंत्रणात आहेत, असे संकेत देणारी विधाने करून पाकिस्तानच्या सरकारचे मंत्री आपल्या देशाचा स्वतःहून पर्दाफाश करीत आहेत. परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनीही दाईश अर्थात आयएसला तालिबान अफगाणिस्तानात थारा देणार नाही, असे जाहीर करून पुन्हा एकदा आपल्या देशासमोरील अडचणी वाढविल्या आहेत.

‘आयएस’ने चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या विरोधात कारस्थान आखल्याचे सांगून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबानवर हा विश्‍वास व्यक्त केला खरा. पण अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी त्यांचे हे विधान उचलून धरून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी तालिबानने कधी संपर्क साधला, अशी विचारणा केली व पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले. याबरोबरच अफगाणिस्तानात रक्तपात घडवित असलेल्या तालिबानच्या मागे पाकिस्तानचे संपूर्ण सहाय्य असल्याचे सांगून अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला धारेवर धरले.

leave a reply