इराणने होर्मुझच्या आखातातून ऑईल टँकर ताब्यात घेतला

दुबई – इंधन आणि व्यापारी वाहतूकीसाठी सर्वाधिक व्यस्त सागरीमार्गात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने नवी कारवाई केली. होर्मुझच्या आखातातून प्रवास करणारे ऑईल टँकर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने ताब्यात घेतले. गेल्या आठवड्याभरात इराणने या सागरी क्षेत्रात केलेली दुसरी घटना ठरते. अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या या कारवाईवर टीका केली. तसेच इराण सदर सागरी क्षेत्रातील सुरक्षा बाधित करीत असल्याची टीका अमेरिकेने केली आहे.

इराणने होर्मुझच्या आखातातून ऑईल टँकर ताब्यात घेतलायुएईच्या दुबई बंदरातून फुजैरा बंदरासाठी रवाना झालेल्या ‘निओवी’ ऑईल टँकरचा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या गस्तीनौकांनी ताबा घेतला. मंगळवारी होर्मुझच्या आखातात इराणने ही कारवाई केल्याची माहती अमेरिकेच्या नौदलाने दिली. सुरुवातीला इराणने या कारवाईची जबाबदारी घेण्याचे टाळले होते. पण पुढच्या काही तासात इराणने बंदर अब्बास येथे सदर टँकर आणून ठेवल्याची माहिती दिली. इराणच्या या कारवाईवर अमेरिकेच्या नौदलाने ताशेरे ओढले. आंतरराष्ट्रीय नियम आणि क्षेत्रीय स्थैर्य व सुरक्षेला आव्हान देणारी इराणने ही कारवाई केल्याचा आरोप अमेरिकेने केला. गेल्याच आठवड्यात इराणने अमेरिकेसाठी प्रवास करणाऱ्या ऑईल टँकरला ओमानच्या आखातातून ताब्यात घेतले होते. सौदी अरेबियाबरोबरच्या सहकार्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या इराणने सागरी क्षेत्रातील कारवाया वाढविल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply