दुभंगलेली अमेरिका हा २०२१ साठी सर्वात मोठा धोका

- अभ्यासगटाचे भाकित

न्यूयॉर्क – ‘दोन तुकडे झालेली महासत्ता पूर्वीप्रमाणे आपला प्रभाव गाजवू शकत नाही. जेव्हा जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशच दुभंगलेला असतो, त्यावेळी सगळेजणच अडचणीत येतात’, या शब्दात ‘युरेशिया ग्रुप’ने विभागलेली अमेरिका हा २०२१ सालातील सर्वात मोठा धोका असेल, असे भाकित वर्तविले आहे.

‘यापूर्वीच्या काळात आलेल्या मोठ्या संकटांमध्ये अमेरिकेकडे जगाला स्थैर्य देण्याची क्षमता आहे, हा विश्‍वास जागतिक समुदायाला वाटत होता. मात्र जगातील एकमेव महासत्तेला सध्या अंतर्गत पातळीवरच जबरदस्त आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे’, असे अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे. भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासमोर अंतर्गत समस्यांना तोंड देऊन जागतिक स्तरावर नेतृत्त्वासाठी अमेरिका सक्षम आहे, हे सिद्ध करण्याची अवघड जबाबदारी आहे, याची जाणीव युरेशिया ग्रुपने आपल्या अहवालात करून दिली. ‘अमेरिकी जनतेतील एका मोठ्या गटाला बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर, त्यांच्या राजकीय प्रभावावर व त्यांचे पद किती काळ टिकेल याबाबत साशंकता आहे. त्याचवेळी अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे भविष्य व देशातील एकूणच राजकीय व्यवस्थेवरही प्रश्‍नचिन्हे उभी राहिली आहेत, याकडेही अभ्यासगटाने लक्ष वेधले आहे.

leave a reply