लंडन – ब्रिटनमध्ये कोरोना साथीची तिसरी लाट येत असल्याचे संकेत मिळत आहेत, असा दावा वरिष्ठ संशोधक प्राध्यापक रवी गुप्ता यांनी केला. प्राध्यापक गुप्ता केंब्रिज विद्यापीठात संशोधक असून ब्रिटन सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी त्यात भारतात आढळणार्या ‘व्हेरिअंट’च्या रुग्णांची वाढ होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ब्रिटनमध्ये 21 जूनपासून लॉकडाऊन पूर्ण शिथिल करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र हा निर्णय लांबणीवर टाकावा, असा सल्ला गुप्ता यांनी दिला आहे.
ब्रिटनमध्ये गेले पाच दिवस कोरोनाचे तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळत असून त्यात नव्या प्रकारातील कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.