युरोपने रशियाचे इंधन किंवा युक्रेन यापैकी एक पर्याय निवडावा

- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा इशारा

लंडन/ब्रुसेल्स – ‘आपल्या युरोपिय मित्रांना लवकरच जाणीव होईल की त्यांना एका पर्यायाची निवड करायची आहे. नव्या इंधनवाहिनींमधून येणारे रशियन इंधन स्वीकारायचे की शांतता व स्थैर्यासाठी युक्रेनला साथ द्यायची याचा निर्णय घ्यावा लागणार आहे’, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला. युरोपला सध्या मोठ्या इंधनसंकटाला तोंड द्यावे लागत असून काही देशांमध्ये नैसर्गिक इंधनवायुचे दर तब्बल २५० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. इंधनसंकटाची व्याप्ती वाढत असतानाच रशियाने युक्रेनच्या सीमेवर जवळपास लाख जवान तैनात केल्याने या क्षेत्रात संघर्षाला तोंड फुटण्याची भीती व्यक्त होत आहे.

युरोपने रशियचे इंधन किंवा युक्रेन यापैकी एक पर्याय निवडावा - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा इशारागेल्या काही दिवसात पाश्‍चात्य देशांकडून सातत्याने रशियाची आक्रमक धोरणे व हालचालींकडे लक्ष वेधण्यात येत आहे. युरोपात निर्माण झालेल्या इंधन संकटामागे रशियाचा हात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्याचवेळी बेलारुस व पोलंडच्या सीमेवर निर्वासितांच्या घुसखोरीचा मुद्दा चिघळला असून यामागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचीच योजना असल्याचे दावे केले जातात. या घटनांसह युक्रेनच्या सीमेवरील वाढती लष्करी तैनाती म्हणजे रशियाने आखलेल्या कटाचा भाग असल्याचे युक्रेन तसेच विश्‍लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

युरोपने रशियचे इंधन किंवा युक्रेन यापैकी एक पर्याय निवडावा - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा इशाराया पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी युरोपला दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो. यापूर्वी २०१४ साली क्रिमिआ व पूर्व युक्रेनवरून पेटलेल्या संघर्षात रशियाने इंधनाचा शस्त्रासारखा वापर केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. नजिकच्या काळात नवा संघर्ष पेटल्यास रशिया पुन्हा त्याचा वापर करील, अशी भीती व्यक्त करण्यात येते. सध्या युरोपच्या गरजेपैकी ३० टक्क्यांहून अधिक इंधन रशियाकडून पुरविण्यात येते. युरोपमध्ये सुरू असणारा हिवाळा, इंधनाची वाढती मागणी व आधीच अपुरा पुरवठा लक्षात घेता रशियाने इंधनाचा शस्त्रासारखा वापर केल्यास युरोपवर भयावह संकट ओढवू शकते.युरोपने रशियचे इंधन किंवा युक्रेन यापैकी एक पर्याय निवडावा - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा इशारा

याची जाणीव असतानाही जर्मनीसारख्या आघाडीच्या युरोपिय देशाने रशियाबरोबर ‘नॉर्ड स्ट्रीम २’ इंधनवाहिनी प्रकल्प पूर्ण केला आहे. ही इंधनवाहिनी अद्याप कार्यरत होणे बाकी असले तरी नजिकच्या काही महिन्यात त्याचा वापर सुरू होण्याचे संकेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर रशियाने युक्रेनबरोबर संघर्ष छेडल्यास युरोपिय देश अडचणीत येण्याची शक्यता असून ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यातून हीच बाब अधोरेखित होत आहे.

leave a reply