कोरोना निर्बंधांवरून युरोपात सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण

ऍमस्टरडॅम/कोपनहेगन – युरोपात कोरोनाची तीव्रता पुन्हा एकदा वाढू लागली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध देशांनी पुन्हा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. या निर्बंधांविरोधात युरोपिय जनतेत असंतोषाचा भडका उडाला असून जवळपास १० देशांमध्ये व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. नेदरलॅण्ड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, बेल्जियम यासारख्या देशांमध्ये निदर्शनांना हिंसक वळण लागले असून जाळपोळ तसेच पोलिसांवर दगडफेक झाल्याचे समोर आले.

कोरोना निर्बंधांवरून युरोपात सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळणलसीकरणाच्या मोहिमेचा वेग मंदावणे व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन यासह उत्तर गोलार्धात चालू झालेल्या हिवाळ्यामुळे युरोपात रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नेही (डब्ल्यूएचओ) जगभरात फक्त युरापिय देशांमध्येच कोरोनाची तीव्रता वाढत असल्याकडे लक्ष वेधले आहे. या पार्श्‍वभूमीवर युरोपमधील अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लादण्यास सुुरुवात केली असून त्यात लॉकडाऊनचाही समावेश आहे.

कोरोना निर्बंधांवरून युरोपात सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळणमात्र विविध देशांच्या सरकारने यासंदर्भात घेतलेले निर्णय जनतेतील नाराजीची भावना अधिक तीव्र करणारे ठरले आहे. त्यातून असंतोष निर्माण झाला असून लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नेदरलॅण्डस्, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, बेल्जियम, क्रोएशिया, इटली, फ्रान्स, नॉर्दर्न आयर्लंड, स्वित्झर्लंड, नॉर्थ मॅसिडोनिया या देशांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांविरोधात व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. त्यातील नेदरलॅण्डस्, डेन्मार्क, ऑस्ट्रिया व बेल्जियममधील निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे.

कोरोना निर्बंधांवरून युरोपात सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळणनेदरलॅण्डस् तसेच बेल्जियममध्ये संतप्त निदर्शकांनी गाड्या तसेच दुकानांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यावेळी निदर्शकांना रोखणार्‍या पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले. पोलिसांवर दगडफेक करून त्यांच्या गाड्यांनाही आगी लावण्यात आल्या. या चकमकींमध्ये जवळपास २० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये शेकडो निदर्शकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुरक्षायंत्रणांनी दिली. पुढील काही दिवसात निदर्शने अधिक व्यापक व आक्रमक होऊ शकतात, असे युरोपियन विश्‍लेषकांनी बजावले आहे.

leave a reply