युएई फ्रान्सकडून ८० रफायल खरेदी करणार

दुबइ – आखातातील संयुक्त अरब अमिरातने (युएई) फ्रान्सकडून ८० रफायल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या युएई दौर्‍यात हा करार करण्यात आला. सुमारे १८ अब्ज डॉलर्सचा हा करार फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार असल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली.

युएई फ्रान्सकडून ८० रफायल खरेदी करणारयुएई फ्रान्सकडून रफायल लढाऊ विमानांची ‘एफ-४’ ही प्रगत आवृत्ती खरेदी करणार आहे. ‘एफ-४’ घेणारा युएई हा पहिलाच देश ठरणार आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी हा करार प्रादेशिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. या करारामुळे युएईच्या संरक्षणक्षमतेत मोठी भर पडणार असल्याचा दावा फ्रेंच विश्‍लेषकांनी केला आहे.

युएई फ्रान्सकडून ८० रफायल खरेदी करणारफ्रान्स व युएईमध्ये अनेक वर्षांपासून चांगले संरक्षण सहकार्य प्रस्थापित झाले आहे. २००९ साली फ्रान्सने युएईमध्ये आपला नौदल तळ उभारला होता. या तळावर फ्रेंच युद्धनौकांसह लढाऊ विमाने तसेच जवानांची तुकडी तैनात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी २०१७ साली सूत्रे हाती घेतल्यानंतर युएईला भेटही दिली होती.

नवा संरक्षण करार मॅक्रॉन यांच्याकडून आखाती देशांबरोबरील संबंध भक्कम करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो. युएईनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष सौदी अरेबियाला भेट देणार आहेत.

leave a reply