ओमिक्रॉनच्या वाढत्या फैलावावरून ‘डब्ल्यूएचओ’ व ब्रिटनचा इशारा

- अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या आठ लाखांवर पोहोचली

जीनिव्हा/लंडन/वॉशिंग्टन – जगभरात ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’चा फैलाव वाढत असून ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’(डब्ल्यूएचओ) तसेच ब्रिटनने याबाबत गंभीर इशारे दिले आहेत. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग आधीच्या ‘डेल्टा व्हेरिअंट’पेक्षा जास्त असून हा व्हेरिअंट लसींची क्षमता कमकुवत करीत आहे, असा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ने दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेला सुरुवात झाल्याचे बजावले आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या आठ लाखांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या फैलावावरून ‘डब्ल्यूएचओ’ व ब्रिटनचा इशारा - अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या आठ लाखांवर पोहोचलीगेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’ची व्याप्ती वेगाने वाढत आहे. अमेरिका व युरोपमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असून नवी लाट आल्याचे संकेत देण्यात येत आहेत. जर्मनी, ब्रिटन, डेन्मार्क, रशिया यासारख्या देशांमध्ये दरदिवशी आढळणार्‍या रुग्णसंख्येचे नवे रेकॉर्ड नोंदविले जात आहेत. आतापर्यंत जगातील सुमारे ६०हून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने नवा ऍलर्ट दिला आहे.

‘ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग यापूर्वी आलेल्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षा अधिक आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या फैलावावरून ‘डब्ल्यूएचओ’ व ब्रिटनचा इशारा - अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या आठ लाखांवर पोहोचलीओमिक्रॉनचा संसर्ग लसीची परिणामकारकता कमकुवत करणारा ठरतो आहे’, असे ‘डब्ल्यूएचओ’ने आपल्या ऍलर्टमध्ये बजावले. त्याचवेळी नव्या व्हेरिअंटची लक्षणे सध्या फारशी तीव्र दिसत नाही, याकडेही लक्ष वेधले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाची तुलना भरतीच्या लाटेशी केली आहे. कोरोनाविरोधातील संघर्षात ब्रिटनमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचा इशारा जॉन्सन यांनी दिला.

लसीचे दोन डोस अपुरे पडण्याची शक्यता असून १८ वर्षांवरील प्रत्येकासाठी बूस्टर डोस आवश्यक असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सांगितले. त्यासाठी विशेष मोहीमही सुरू करण्यात आल्याचे जॉन्सन यांनी जाहीर केले. ब्रिटनमधील कोविड ऍलर्ट लेव्हल चारपर्यंत वाढविण्यात आली आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या फैलावावरून ‘डब्ल्यूएचओ’ व ब्रिटनचा इशारा - अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या आठ लाखांवर पोहोचलीयापूर्वी मे महिन्यात ब्रिटनमधील कोविड लेव्हल या स्तरावर नेण्यात आली होती. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या बळीची नोंद झाल्याचेही पंतप्रधान जॉन्सन यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेत ओमिक्रॉनबरोबरच त्यापूर्वी आलेल्या डेल्टा व्हेरिअंटचा फैलाव सुरू असल्याचे समोर येत आहे. या फैलावामुळे अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या पाच कोटींवर जाऊन पोहोचली आहे. कडक हिवाळा व लसीकरणाला होणारा विरोध ही वाढत्या संसर्गाची प्रमुख कारणे ठरल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील कोरोना बळींची संख्याही आठ लाखांवर गेल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. यातील ५७ टक्के बळी लस न घेतलेले रुग्ण होते, असे आरोग्यतज्ज्ञांनी नमूद केले.

leave a reply