युक्रेनवरील आक्रमण ही रशियासाठी घोडचूक ठरेल

- ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

लंडन/मॉस्को – ‘रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण ही रशियासाठी मोठी घोडचूक ठरेल. रशियाच्या आक्रमणाला पाश्‍चात्य देश सर्वसामर्थ्यानिशी प्रत्युत्तर देतील. यात रशियाचे हितसंबंध व अर्थव्यवस्थेला जबर हानी पोहोचविणार्‍या निर्बंधांचाही समावेश असेल. यातून बाहेर पडण्यासाठी रशियाकडे फक्त चर्चेचा पर्याय शिल्लक आहे’, असा खरमरीत इशारा ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी दिला. ट्रुस यांच्या इशार्‍यावर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनचा नाटोत समावेश करून लष्करी तैनातीचा प्रयत्न झाल्यास युरोपात युद्ध भडकेल, असे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी बजावले.

युक्रेनवरील आक्रमण ही रशियासाठी घोडचूक ठरेल - ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारायुक्रेनच्या मुद्यावरून गेले काही दिवस रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झडत आहेत. अमेरिका व ब्रिटनसह नाटोकडून रशियाला वारंवार गंभीर परिणामांचे इशारे देण्यात येत आहेत. तर रशियन नेतृत्त्व उघडपणे मोठ्या युद्धाची शक्यता व धोका व्यक्त करीत आहेत. युक्रेनच्या एका मंत्र्यांनी तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडण्याचे वक्तव्यही केले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून आलेले वक्तव्यही शाब्दिक चकमकींचा भाग असल्याचे दिसत आहे.

युक्रेनवरील आक्रमण ही रशियासाठी घोडचूक ठरेल - ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारायुक्रेनवरील आक्रमणावरून इशारा देतानाच ब्रिटनच्या मंत्र्यांनी रशियाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाचेही स्वागत केले आहे. रशियाने गेल्या आठवड्यात पाश्‍चात्य देशांसमोर ‘सिक्युरिटी पॅक्ट’चा प्रस्ताव समोर ठेवला आहे. या प्रस्तावात, युक्रेनला नाटोच्या सदस्यत्वापासून दूर ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रशियाच्या प्रस्तावावर पाश्‍चात्य देशांनी पुढील पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने नाटो तसेच युरोपिय महासंघाच्या अधिकार्‍यांबरोबर बोलणी केली आहेत. पुढील महिन्यात रशियाबरोबर एक बैठक घेतली जाईल, असे संकेत या बोलण्यांनंतर देण्यात आले आहेत.

युक्रेनवरील आक्रमण ही रशियासाठी घोडचूक ठरेल - ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारादरम्यान, रशियाने सिक्युरिटी पॅक्टअंतर्गत करण्यात आलेल्या मागण्यांवर आग्रही भूमिका घेतली असून पाश्‍चात्यांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी एका मुलाखतीत, युक्रेनच्या नाटो सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला. ‘युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देणे हा रशियाच्या सुरक्षेसाठी धोका आहे. सदस्यत्व दिल्यानंतर युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रे तैनात होऊ शकतात. रशियाच्या सुरक्षेला धोका असणार्‍या या क्षेपणास्त्रांची तैनाती रशियाच कधीच स्वीकारणार नाही. युक्रेनवरील आक्रमण ही रशियासाठी घोडचूक ठरेल - ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारायातून सर्व सहभागी देशांना धोका निर्माण होईल. युरोपात युद्धाचा भडकाही उडू शकतो’, असा इशारा लॅव्हरोव्ह यांनी दिला.

रशियाने युक्रेनच्या सीमेनजिक जवळपास एक लाख जवान तैनात केल्याचे दावे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. या दाव्यांबरोबरच रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती देणारे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. रशिया आक्रमणाची तयारी करीत असल्याचे आरोप पाश्‍चात्य देश करीत आहेत. हे आरोप फेटाळत रशियाने सदर लष्करी तैनाती रशियाच्या सुरक्षेचा भाग असल्याचे वारंवार म्हटले आहे.

leave a reply