कझाकस्तानच्या बंडामध्ये अमेरिकेचा हात नाही

- अमेरिकेचा खुलासा

अमेरिकेचा खुलासावॉशिंग्टन – कझाकस्तानच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या हिंसक उठावामध्ये अमेरिकेची भूमिका नसल्याचा खुलासा बायडेन प्रशासनाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी केला. काही रशियन्स विनाकारण यात अमेरिकेला गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा ठपका साकी यांनी ठेवला आहे.

कझाकस्तानमधील हिंसाचारावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने निदर्शकांना शांतता तर सरकारी यंत्रणांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी देखील कझाकस्तामधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. तसेच येथील घडामोडींवर अमेरिकेची बारीक नजर असल्याचे साकी म्हणाल्या. ‘काही रशियन्स यामागे अमेरिकेचा सहभाग असल्याचे वेडसर दावे करीत आहेत. पण यात तथ्य नसून अमेरिका अजिबात सहभागी नाही`, असे साकी म्हणाल्या.

कझाकस्तानमधील घडामोडींमध्ये पदेशी हस्तक्षेप नको, असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने काही तासांपूर्वी म्हटले होते. पण कझाकस्तानातील परिस्थितीसाठी रशियाने अमेरिकेवर आरोप केलेला नाही, हे रशियन माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

leave a reply