पाकिस्तानचे शंभराहून अधिक जवान ठार केल्याचा बलोच बंडखोरांचा दावा

क्वेट्टा – बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारी बंडखोर संघटना ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) पाकिस्तानला जबरदस्त हादरा दिला. पंजगुर आणि नुश्की या बलोचिस्तानच्या शहरांमध्ये पाकिस्तानच्या लष्करावर बीएलएने घणाघाती चढविले असून यात पाकिस्तानी लष्कराचे शंभराहून अधिक जवान मारल्याचा दावा ‘बीएलए’ने केला आहे. तर पाकिस्तानच्या लष्कराने मात्र या चकमकीत १३ हल्लेखोर ठार झाल्याचे सांगून आपले सात जवान ठार झाल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्याचे धागेदोरे अफगाणिस्तान आणि भारतात असल्याचा आरोप पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी केला आहे.

पाकिस्तानचे शंभराहून अधिक जवान ठार केल्याचा बलोच बंडखोरांचा दावापंजगुर आणि नुश्की येथे पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांना लक्ष करून बीएलएच्या बंडखोरांनी काही काळासाठी या चौक्यांचा ताबा घेतल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. पाकिस्तानकडून केल्या जाणार्‍या मानवाधिकारांच्या हननाविरोधात आवाज उठविणार्‍या काही कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली. तसेच बीएलएच्या बंडखोरांनी पाकिस्तानी जवानांना आपल्या ताब्यात ठेवले होते, असेही हे कार्यकर्ते भारतीय वृत्तवाहिन्यांवर सांगत होते. पण पाकिस्तानच्या लष्कराच्या ‘इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स-आयएसपीअर’ने याबाबतच्या बातम्या दडपून टाकल्या. बराच काळ याची माहिती पाकिस्तानी लष्कराने उघड होऊ दिली नाही.

पाकिस्तानचे शंभराहून अधिक जवान ठार केल्याचा बलोच बंडखोरांचा दावायाची माहिती उघड केल्यानंतरही आयएसपीआरने याचे सारे तपशील माध्यमांमध्ये येऊ दिले नाहीत. या हल्ल्याची तीव्रता जनतेसमोर येऊ नये, अशारितीने पाकिस्तानी माध्यमांना याच्या बातम्या पुरविण्यात आल्या. या हल्ल्यात १३ हल्लेखोर ठार झाल्याची माहिती देऊन या चकमकीत हल्लेखोरांचेच अधिक नुकसान झाल्याचा दावा आयएसपीआरने केला. त्याचवेळी या हल्ल्यात आपले सात जवान ठार झाल्याची माहिती आयएसपीआरने दिली. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी माध्यमांना याची माहिती देताना आपल्या लष्कराने फार मोठा पराक्रम गाजवून सर्वच हल्लेखोरांना ठार केल्याचे दावे ठोकले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही हा हल्ला परतवून लावल्याबद्दल लष्कराचे अभिनंदन केले आहे.

तसेच या हल्ल्याची सूत्रे अफगाणिस्तान व भारतातून हलविली जात होती, असा बेताल आरोप शेख रशिद यांनी केला आहे. पण बीएलएने यासंदर्भात दिलेली माहिती अतिशय वेगळी आहे. लेखी निवेदन प्रसिद्ध करून बीएलएने या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे शंभराहून अधिक जवान ठार झाल्याचा दावा केला. तसेच बलोचिस्तानातील पाकिस्तानचे टेलिकम्युनिकेशन नेटवर्क बंद पाडल्याची माहितीही बीएलएने दिली आहे.

leave a reply