रशिया-युक्रेन युद्धामुळे आशिया, आफ्रिका व आखाताची अन्नसुरक्षा धोक्यात

- संयुक्त राष्ट्रसंघटनेने बजावले

रशिया-युक्रेन युद्धामुळेरोम – रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याच्या दरांमध्ये २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून आशिया, आफ्रिका व आखाती देशांमध्ये अन्नधान्याची गंभीर समस्या उद्भवू शकते, असे संयुक्त राष्ट्रसंघटनेने बजावले आहे. ‘दोन देशांमधील युद्ध लांबले तर युक्रेनमध्ये पुढील हंगामात पिक येण्याची शक्यता कमी आहे. तर रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे हा देश अन्नधान्याची निर्यात करु शकेल याबाबत अनिश्‍चितता आहे’, असे सांगून ‘फूड ऍण्ड ऍगिकल्चर ऑर्गनायझेशन’ने (एफएओ) संभाव्य संकटाकडे लक्ष वेधले. रशिया-युक्रेन युद्धामुळे आखाती देशांमध्ये अन्नासाठी दंगली उसळतील, असा इशारा विश्‍लेषकांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.

रशिया-युक्रेन युद्धामुळेरशिया व युक्रेन या देशांचा उल्लेख जगाचे ‘ब्रेडबास्केट’ असा करण्यात येतो. गहू, कडधान्य, मका, सूर्यफूल यांच्या उत्पादनात हे देश आघाडीवर आहेत. जागतिक कडधान्याच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे १४ टक्के निर्यात रशिया व युक्रेनमधून केली जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशांमधील शेतीवर मोठे परिणाम झाले आहेत. रशियावरील निर्बंधांमुळे या देशातून होणारी अन्नधान्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहेत. तर युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यांमुळे या देशातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळेया पार्श्‍वभूमीवर, ‘फूड ऍण्ड ऍगिकल्चर ऑर्गनायझेशन’ने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. युद्धाच्या परिणामांमुळे जागतिक स्तरावरील अन्नधान्याच्या किंमतींमध्ये जवळपास २० टक्क्यांची वाढ होऊ शकते, असे ‘एफएओ’चे प्रमुख कु डॉंग्यू यांनी सांगितले. आशिया, आफ्रिका व आखातातील गरीब देश रशिया तसेच युक्रेनमधून आयात होणार्‍या गव्हावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र युद्धामुळे निर्माण झालेल्या स्थितीत या देशांना वेेळेत व पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होण्याची शक्यता कमी असून त्यामुळे सदर देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई उद्भवू शकते, असा इशारा ‘एफएओ’ने दिला.

युक्रेनने युद्धामुळे काही प्रमाणातील निर्यात आधीच रोखली असून त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटण्यास सुरुवात झाली आहे, याकडेही संघटनेने लक्ष वेधले.

leave a reply