अब्राहम करारानंतर इस्रायलने अरब देशांशी अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांचे करार केले

- इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची घोषणा

जेरूसलेम – दीड वर्षांपूर्वी इस्रायल आणि अरब देशांमध्ये झालेल्या अब्राहम करारानंतर इस्रायलने अरब देशांबरोबर तब्बल तीन अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांचे करार केले आहे. येत्या काळात हे सहकार्य अधिकच व्यापक होईल. कदाचित आखातातील सुन्नी-अरब देशांनाही इस्रायल शस्त्रास्त्रांची विक्री करील, असा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.

अब्राहम करारानंतर इस्रायलने अरब देशांशी अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांचे करार केले - इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची घोषणा2020 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल आणि युएई व बाहरिन या अरब देशांमध्ये अब्राहम करार संपन्न झाला होता. या कराराचा हवाला देऊन इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी अरब देशांबरोबरील वाढत्या लष्करी सहकार्याची माहिती जाहीर केली. गेल्या दीड वर्षांमध्ये इस्रायली अधिकाऱ्यांनी क्षेत्रातील अरब देशांबरोबर जवळपास 150 बैठका घेतल्याची माहिती संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिली.

इस्रायलसह शस्त्रसहकार्य करणाऱ्या अरब देशांचा उल्लेख करण्याचे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी टाळले. तसेच या अरब-आखाती देशांना कुठल्या प्रकारचे शस्त्रास्त्रे पुरविली, याचे तपशील इस्रायलने उघड केलेले नाही. अब्राहम करारानंतर इस्रायलने अरब देशांशी अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांचे करार केले - इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची घोषणापण यामध्ये इजिप्त व जॉर्डन या इस्रायलच्या शेजारी अरब देशांचा समावेश नसल्याचे संरक्षणमंत्री गांत्झ म्हणाले. त्यामुळे इस्रायलशी अब्राहम करार करणाऱ्या युएई, बाहरिन या देशांचा यात समावेश असण्याची शक्यता वाढली आहे.

तीन अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलेले हे सहकार्य येत्या काळात वाढविण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिली. यामध्ये काही सुन्नी अरब देशांचाही समावेश होईल, असे सांगून इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सौदी अरेबियाबरोबरील सहकार्याचे संकेत दिल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीतआहेत. इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या धोक्याविरोधात इस्रायल अरब देशांना हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची तयारी इस्रायलने काही दिवसांपूर्वीच दाखवली होती.

leave a reply