सिरियातील रशियन नौदल तळाजवळ इस्रायलच्या लढाऊ विमानांचे हल्ले

रशियन नौदलदमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियात केल्या हवाई हल्ल्यांमध्ये तीनजण ठार झ्ााले आहेत. सिरियन लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये सिरियाची राजधानी दमास्कस व तार्तूस येथील रशियन नौदलाच्या तळाजवळील हल्ल्यांचा समावेश आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात तार्तूस येथील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. काही आठवड्यांपूर्वी इस्रायलने सिरियात चढविलेले हल्ले रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने यशस्वीरित्या भेदल्याची बातमी प्रसिद्ध झ्ााली होती. इस्रायलबरोबर निर्माण झ्ाालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर रशियाने ही कारवाई केल्याचा दावा केला जात होता. अशा परिस्थितीत, रशियन नौदलाच्या तळाजवळील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करणारी इस्रायलची ही कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरतेे.

सिरियाची सरकारी वृत्तवाहिनी ‘सना’ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोन प्रमुख शहरांवर हवाई हल्ले झ्ााले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या हद्दीत घुसून सिरियात हे हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन वृत्तवाहिनीने केला. यापैकी राजधानी दमास्कसच्या उपनगरात चढविलेल्या हल्ल्यात तीन सिरियन जवान जखमी झ्ााल्याचे सिरियन अधिकाऱ्याने सांगितले. येथील हिजबुल्लाहच्या चौकीला इस्रायली विमानांनी लक्ष्य केल्याची माहिहती सिरियन वृत्तवाहिनीने दिली आहे.

रशियन नौदलयाच सुमारास सिरियाच्या पश्चिम किनारपट्टीवरील ‘तार्तूस’ येथील इराणच्या लष्करी तळावर इस्रायलने कारवाई केली. या हल्ल्यात इराणचे तळ नष्ट झ्ााल्याचे सिरियन वृत्तवाहिनीने सांगितले. रशियाच्या नौदलतळापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर हा हल्ला झ्ााल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने सिरियन सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. या हल्ल्यात तीन सिरियन जवान मारले गेले असून या हल्ल्याद्वारे इस्रायलने या हल्ल्यात येथील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

परदेशी माध्यमांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर इस्रायलने आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तार्तूस येथील इराणच्या लष्करी तळावरील इस्रायलची ही कारवाई लक्षवेधी ठरते. काही दिवसांपूर्वी इस्रायलने सिरियातील इराणच्या लष्करी तळावर अशीच कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झ्ााल्या होत्या. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यांना सिरियन लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दावे स्थानिक माध्यमांनी केले होते. पण पुढच्या काही दिवसात रशियाने इस्रायलच्या हवाई हल्ल्यांविरोधात सिरियातील आपली ‘एस-300’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली होती.

गेल्या चार महिन्यांपासून रशिया व युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धात इस्रायलने युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविले होते. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघातही रशियाविरोधी ठरवाला इस्रायलने पाठिंबा दिला होता. यामुळे संतापलेल्या रशियाने सिरियात हल्ले चढविणाऱ्या इस्रायलच्या लढाऊ विमानांविरोधात हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केल्याचे दिसत आहे. तर रविवारी रात्री तार्तूस येथील हल्ल्यात रशियन हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करून इस्रायलने रशियाला प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे.

leave a reply